रविंद्र भवन कुडचडेतर्फे गणेशोत्सवानिमित्त दिनुच्या सासुबाई राधाबाई मराठी नाटक

0
998

गोवा खबर:रविंद्र भवन कुडचडे व कुडचडे काकोडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खास गणेशोत्सवानिमित्त दोन दिवशिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुंबई येथील गाजलेले नाटक व गोव्यातील तियात्रांचा समावेश आहे.

९ सप्टेंबर रोजी संध्या ७ वाजता पीटर रोशन निर्मित “जॉनी जॉनी यस पापा” हा तियात्र सादर होईल. १० सप्टेंबर रोजी वेद प्रॉडक्शन निर्मित महाराष्टभर गाजलेले मराठी नाटक “दिनुच्या सासुबाई राधाबाई” सादर केले जाईल. दोन्ही प्रयोग रविंद्र भवन कुडचडेच्या सभागृहात होणार आहेत. विनामुल्य प्रवेशिका रविंद्र भवन कुडचडेच्या कार्यालयात उपलब्ध आहेत असे कार्यक्रमाचे निमंत्रक  जीतेंद्र उर्फ नवीन खांडेकर, फेलिक्स फर्नांडीस, मयुर नायक व जयकुमार खांडेकर यांनी सांगितले.

       रसिकानी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन रविंद्र भवन कुडचडेचे सदस्य सचिव अजय गावडे, उपाध्यक्ष  राजू नाईक व अध्यक्ष  निलेश काब्राल यांनी केले आहे