रन फॉर ग्रीन गोवा मॅरेथॉनसाठी दहावी गोवा रिव्हर मॅरेथॉन

0
987

 

 

या उपक्रमात प्लास्टिकचा शून्य वापर, धावपट्टूना स्वतः बॉटल आणाव्या लागतील.

 

 गोवा खबर: गोवा रिव्हर मॅरेथॉन (जीआरएम) च्या 10 व्या आवृत्तीचे नाव ‘रन फॉर ग्रीन गोवा असे देण्यात आले आहे. टीम वास्को स्पोर्ट्स क्लब यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबाबत माहिती दिली.

 

या लोकप्रिय मॅरेथॉनच्या दहाव्या आवृत्तीच्या आयोजकांनी ‘रन फॉर ग्रीन गोवा’ थीम निवडल्याची माहिती वास्को स्पोर्ट्स क्लबचे सचिव राकेश उन्नी यांनी पत्रकारांना दिली. “या उपक्रमात प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर मुळीच केला जाणार नाही. पाणी आणि इलेक्ट्रोलाइट स्थानकांना ‘फिलिंग स्टेशन’ असे संबोधण्यात येईल आणि जे लोक धावणार आहेत त्यांना स्वतःच्या बाटल्या घेऊन येण्यास सांगितले गेले आहे, ज्या येथील स्टेशनवर पुन्हा भरल्या जातील. कपड्यांच्या पिशव्यांमध्ये रेसर किटसुद्धा वाटण्यात येणार आहेत, ”उन्नी म्हणाले.

उन्नी यांच्यामते, स्पोर्ट्स एक्सपोमध्ये एक खास स्टॉल असेल जिथे टेलर्स जुन्या रेस टी-शर्टसचे रूपांतर किराणा आणि भाजीपाला खरेदीच्या पिशवीमध्ये करतील. धावपट्टूनी त्यांच्या जुन्या टी-शर्टसह प्रदर्शनाला भेट द्यावी आणि कपड्यांच्या शॉपिंग पिशव्या घेऊन परतावे,” असेही उन्नी यांनी स्पष्ट केले.

वास्को स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष नितीन बांदेकर ज्यांनी माध्यमातील लोकांशी संपर्क साधला ते म्हणाले, ऑनलाईन नोंदणी www.goarivermarathon.com या वेबसाईटवर करण्यात येत आहे.

फुल्ल मॅरेथॉन, हाल्फ मॅरेथॉन आणि 10 किमीच्या रेससाठी आणि 5 किमीच्या फन रनसाठी भारतातील २१ राज्यांतील सुमारे 2800 सहभागी पूर्ण तयारीनिशी दाखल झाले आहेत.  या स्पर्धेसाठी १२ देशांतील आंतरराष्ट्रीय अथलेट्सनी नावनोंदणी केली आहे, तर केनिया आणि इथिओपियाच्या आफ्रिकन देशांमधील खेळाडूंनी आमच्याकडे नोंदणीच्या ​​तपशीलासाठी संपर्क साधला आहे, ”असे बांदेकर यांनी सांगितले

बांदेकर यांच्या मते, आयोजकांनी शर्यतीची जागा योग्य शर्यत व्हावी म्हणून बदलली आहे. “सगळ्या रेस चिखली पंचायतीच्या इमारतीच्या समोर चिखली पंचायत मैदानावर समाप्त होतील. प्रत्येक रेसचा रूट दरवर्षी असतो तसाच राहील.” असे बांदेकर म्हणाले.

या वर्षाच्या दहाव्या जीआरएमकडे सर्व शर्यतींसाठी एकूण 7 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.