रक्षा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींच्या निवासी सुविधा पुनर्जीवित योजनेचे भूमिपूजन

0
450

 

गोवा खबर:केंद्रीय आयुष मंत्री  तथा रक्षा राज्यमंत्री श्रीपाद  नाईक यांनी शनिवारी फोंडा येथील तांत्रिक प्रशिक्षण केंद्राला  (२ सिग्नल ट्रेनिंग सेंटर) येथे सैन्याच्या प्रीमियर प्रशिक्षण प्रकल्पाला भेट दिली. या भेटीदरम्यान, आरआरएम  युनिटद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध   प्रकल्पांवरील प्रशिक्षण आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेतला.

श्रीपाद नाईक यांनी (कमिशनंट २ सिग्नल ट्रेनिंग सेंटर ) ब्रिगेडियर  संजय रावळ यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थींच्या निवासी सुविधा पुनर्जीवित योजनेचे भूमिपूजन केले.पायाभूत सुविधांशी संबंधित कामांची माहिती तांत्रिक प्रशिक्षण रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मानवेंद्र नागाईच यांनी त्यांना दिली.

नाईक यांनी प्रशिक्षण क्षेत्राच्या आवारातील  सुविधा केंद्रांची ही माहिती करून घेतली. नजीकच्या भविष्य काळात बांधण्यात येणाऱ्या साधनसुविधा विषयी माहिती    नाईक  यांना देण्यात आली. जवानांच्या तांत्रिक कौशल्यांचा सन्मान करण्यासाठी गोव्यातल्या फोंडा येथील आस्थापनेत आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना अनुकूल  वातावरणात शिक्षण उपलब्ध  व्हावे यासाठी  पायाभूत सुविधांत सुधारत करण्यात आला आहे.

नाईक यांनी 2 सिग्नल ट्रेनिंग सेंटरचे कौतुक केले.  देश सेवेत मोलाचे योगदान देत अनुकरणीय काम करत राहण्याबाबत युनिटला प्रोत्साहन दिले व युनिटला नेहमीच  सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.