रंगसम्राज्ञी पुस्तक पुढच्या पिढीला आदर्श ठरणार:गावडे

0
1315
गोवाखबर:स्त्री कलाकारांना एकत्रित आणून त्यांचा गौरव करण्याची किमया मोरजी गावातच घडू शकते.निवृत्ती शिरोडकर यांचे रंगसम्राज्ञी पुस्तक पुढच्या पिढीला आदर्श ठरणार असल्याचे प्रतिपादन कला आणि सांकृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी मोरजी येथे केले .
मोरजी येथील पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांनी स्त्री नाट्य कलाकारांच्या जीवनावर लिहिलेल्या रंगसम्राज्ञी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व सत्कार समारंभ २१ रोजी श्री कळसदेव मांगर सभाग्रह येथे साई माऊली कला संघ , मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ आणि गोवा मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला  माजी मंत्री संगीता परब , गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत , मोरजी उपसरपंच अमित शेटगावकर , पंच सदस्या तथा माजी सरपंच वैशाली शेटगावकर , पंच तुषार शेटगावकर , मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दीपक शेटगावकर , मोरजाई देवस्थान समितीचे पदाधिकारी संतोष शेटगावकर , प्रा. विठोबा बगळी ,शुभदा च्यारी आदी उपस्थित होते .
स्वागत सूत्रसंचालन शुभदा चारी यांनी केले , निवृत्ती शिरोडकर , सुचिता शिरोडकर , काजल , दिनकर हळर्णकर , मक्सबी  म्हाल्गीमनीआदींनी पाहुण्याचे पुष्पगुच्छांनी स्वागत केले .
मंत्री गावडे म्हणाले,  कलाकारांची योग्य ती दखल घेवून कला आणि सांस्कृतिक खाते जर एखादा कलाकार आजारी असेल व तो हॉस्पिटलमध्ये उपचार करीत असेल आणि त्याला जर आर्थिक मदतीची गरज लागली तर सरकार ती द्यायला तयार आहे .
      यावेळी माजी शिक्षण मंत्री संगीता परब यांनी बोलताना सांस्कृतिक मुल्यांची जपणूक करणारे कलाकारच खऱ्या अर्थाने संस्कृतीचे रक्षक आहेत , त्या कार्याची सक्षम धुरा आजच्या युवा कलाकारांनी आपल्या खांद्यावर पेलायला हवी असे सांगितले .
      गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामत म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मराठी रंगभूमीची सेवा करणाऱ्या स्त्री कलाकारांनी गोव्यात मराठी खऱ्या अर्थाने जिवंत ठेवली अश्या स्त्री कलाकारांचा पुस्तक रूपाने परिचय झाला तो पुढच्या पिढीला इतिहास एक दस्त ऐवज ठरेल .
लेखक निवृत्ती शिरोडकर यांनी गोव्यातील सर्व नाट्य स्त्री कलाकारांना एकत्रित आणून स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा मनोदय शिरोडकर यांनी व्यक्त केला ,त्याच्या या संकल्पलेला गोवा मराठी अकादमीचे योग्य ते सहकार्य मिळणार असल्याची ग्व्वाही दिली .
        प्रा. विठोबा बगळी यांनी बोलताना निवृत्ती शिरोडकर हे केवळ पत्रकार या पुरती आणि बातम्यांचे संकलन करण्यापर्यंत मर्यादित नाही समाजात कुणी चांगले कार्य करीत असेल तर त्याला प्रकाशझोतान आणण्याचे त्यांचे काम चालू आहे , एकाच व्यासपीठावर ५५ स्त्री कलाकारांना एकत्रित आणून त्यांचा गौरव करण्याच्या कार्याला तोड नसल्याचे सांगितले .
     लेखक निवृत्ती शिरोडकर यांनी मनोगत व्यक्त करताना राज्यातील अनेक स्त्री कलाकारांनी खूप परिश्रम घेवून हि कला जोपासली , काही कलाकाराचे जीवन आजही हालीखीचे आहे . त्याना राहण्यासाठी घरही नाही अश्या कलाकारांना हक्काचे घर मिळावे म्हणून कला खात्याने घरकुल योजना करावी दरवर्षी युवा पुरस्कार व राज्य पुरस्कार कलाकारांना दिले जातात त्या संखेत  वाढ करावी अशी मागणी करून स्त्री कलाकारावर तिसरे पुस्तक रंगदेवता लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचे सांगून दैनिक हेराल यांनी दीर्घकाळ रंगशारदा हे सदर लिहायला जागा उपलबद्ध करून दिल्याबद्दल कृतन्यता व्यक्त करून ,सर्व स्त्री नाट्य कलाकारांना एकत्रित आणून स्त्री नाट्य स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला . आता पर्यंत आपण प्रत्येक कलाकाराच्या घरी जावून मुलाखती घेतल्या मात्र नम्रता नाईक या एकमेव स्त्री कलाकाराची मुलाखत आपण फोन द्वारे घेतल्याचे सांगितले .
यावेळी एकूण ५५ स्त्री नाट्य कलाकारांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले , यावेळी चित्रकार राजमोहन शेट्ये , अनघा देशपांडे व शुभदा च्यारी याना खास गौरवण्यात आले . लेखक निवृत्ती शिरोडकर यांनी पाहुण्याना स्मृतीचिन्ह भेट दिली .
सुरज शेटगावकर , रोहित नाईक , श्रद्धा जोशी अर्चना कामुलकर यांनी सादर केलेल्या नांदीने रसिकाचे लक्ष वेधून घेतले . सत्कार मूर्तीच्या वतीने जेष्ठ नायिका शोभा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले .
शेवटी निवृत्ती शिरोडकर यांनी आभार मानले .