योग म्हणजे निरोगी शरीराची खरी गुरुकिल्ली- योग प्रशिक्षक संदेश बारझनकर

0
530

 गोवा खबर:योग म्हणजे निरोगी शरीराची खऱी गुरु किल्ली असुन नियमित योगासने ही शरीराची  कार्यक्षमता वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पतंजली योग समितीचे योग प्रशिक्षक संदेश बारझनकर यांनी केले.

ते भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, पणजी यांच्या वतीने रविंद्र भवन, साखळी येथे आयोजित अंतरराष्ट्रीय योग दिवस या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेत बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की योग ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी असुन इतर देशामध्ये ही योगाचे अनुकरण मोठ्या प्रमाणे होताना दिसत आहे. आजारांवर नियंत्रण करण्यासाठी नियमितपणे योगासने व व प्राणायम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थितांना योग या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले तसेच योगासने व प्राणायम यांची प्रात्याक्षिके ही करुन दाखविण्यात आली.

क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो पणजीचे क्षेत्रीय प्रचार प्रमुख विकास तापकीर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. योग विषयावर प्रचार कार्यक्रमांची माहीती देऊन त्यांनी आजारमुक्त व  निरोगी भारतासाठी प्रत्येक व्यक्ती पर्यंत योगाचे महत्व पोहचणे आवश्यक असुन प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी म्हणुन योगाचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन केले.

या वेळी उपस्थितांसाठी कार्यालयाच्या वतीने योग विषयावर प्रश्न मंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धे मध्ये श्याम पेडणेकर, यांनी प्रथम क्रमांक तर वर्षा कदम आणि आप्पा गावर यांनी अनुकमे व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावले.