यूथ हॉस्टेलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

0
1028
अखिल गोवा माजी सैनिक संघटनेतर्फे 70 वा स्वातंत्र्य दिन मीरामार येथील यूथ हॉस्टेलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन दत्ताराम सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यूथ हॉस्टेलचे संचालक अनंत जोशी यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते आणि नृत्य सादर केले. कृष्णाजी शेटकर,कॅप्टन सावंत आणि नामदेव नारोलकर यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.उपस्थित मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.शेवटी हॉस्टेलच्या वॉर्डन अक्षदा जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.