यूथ फ्रेंड्लीजसाठी लालिगाचे आरएफ यंग चॅम्पसला आमंत्रण

0
902

30 आरएफ यंग चॅम्पसना रियल मॅड्रिड, अॅटलॅटिको दे मॅड्रिड, वॅलेंसिया, विलारियल आणि

लेगनेस या यूथ फ्रेंड्लीजसामध्ये खेळण्याची संधी व प्रशिक्षण

रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स या भारतातील पहिल्या उच्चभ्रू निवासी फुटबॉल अकादमीला एआयएफएफच्या
सर्वोच्च फोर-स्टार अधिस्वीकृतीने पुरस्कृत करण्यात आले. तसेच 2 आठवड्यांच्या युवास्नेही सहकार्यासाठी स्पेनच्या
लालिगाने आमंत्रित केले आहे.
शनिवार, 16 सप्टेंबर 2017 रोजी आरएफ यंग चॅम्प्स या प्रयोगशील दौऱ्यावर निघणार असून लालिगा क्लबचे
अकादमी संघ रियल मॅड्रिड, अॅटलॅटिको दे मॅड्रिड, वॅलेंसिया, विलारियल, रायो वेलेंकॅनो आणि लेगनेस सोबत
प्रशिक्षण आणि खेळण्यावर लक्ष केंद्रित असेल.
आरएफ यंग चॅम्पसमध्ये 12 वर्षांखालील आणि 14 वर्षांखालील वयोगटातील 30 अकादमी प्रतिभावानांचा सहभाग
राहणार असून मार्क वाएसन हेड कोच असतील. सोबत इतर सपोर्ट स्टाफदेखील असेल. आरएफ यंग चॅम्प्सकडे सध्या
नवी मुंबईतील निवासी सुविधा केंद्रात 48 प्रतिभावान खेळाडू आहेत.
10 दिवसांच्या या दौऱ्यात 30 भारतीय युवा चॅम्प्सना लालिगाचे लाईव्ह सामने पाहायला मिळतील. ज्यामध्ये
एफसी बार्सिलोना आणि रियल मॅड्रिड इत्यादींचा समावेश राहील.
दोन वर्षांमध्ये आरएफ यंग चॅम्पसकरिता लालिगा हा दुसरा प्रायोगिक दौरा आहे. मी 2016 मध्ये आरएफ यंग
चॅम्पसना प्रीमिअर लीगने अशाच एका युवास्नेही दौऱ्यासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी 9 क्लबचे अकादमी संघांनी
सहभाग घेतला होता. ज्यामध्ये चेल्सी, मँचेस्टर सिटी, लिव्हरपूल, मँचेस्टर युनायटेड, वेस्ट ब्रोमविच इत्यादींचा
समावेश होता.