युसेन बोल्टचा कारकिर्दीला अखेरचा सलाम

0
998

वेगाचा बादशाह  युसेन बोल्टला आपल्या कारकिर्दीतली अखेरची शर्यत जिंकता आलेली नाही. जमैकाच्या ४ बाय १०० मीटर शर्यतीच्या संघातून उसेन धावत होता. त्याच्या संघातल्या अन्य तीन जणांनी आपलं लॅप पू्र्ण केलं आणि बॅटन युसेनकडे दिलं. युसेन धावला.  पण काही अंतरावरच त्याच्या पायाच्या स्नायूंमध्ये जबरदस्त कळ आली आणि तो खाली कोसळला. व्हीलचेअरवर बसण्यास नकार देत त्याही अवस्थेत अखेरचा ३० मीटर्सचा ट्रॅक आपल्या संघातल्या खेळाडूंच्या आधारानं त्याने पूर्ण केला आणि आपल्या खेळाला अखेरचा सलाम केला.. कारकिर्दीला सुवर्ण निरोप देण्याचा क्षण मात्र हुकला.

या स्पर्धेत  ग्रेट ब्रिटनला सुवर्ण, अमेरिकेला रौप्य तर जापानला कांस्य पदक मिळालं. बोल्ट खाली कोसळला होता. त्याला न्यायला व्हीलचेअर आणण्यात आली पण त्यावर बसण्यास त्यानं नकार दिला. आपल्या संघातल्या खेळाडूंचा आधार घेत अडखळत का होईना पण त्याने अखेरचा ३० मीटरचा ट्रॅक पूर्ण केला. अधिकृतपणे जमैकाच्या संघानं ही स्पर्धा पूर्ण केली नाही. पण आपल्या कारकिर्दीतल्या १९ मोठ्या चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकणाऱ्या बोल्टला त्याची ही अखेरची शर्यत अखेरपर्यंत पूर्ण करायची होती आणि त्याने की केली.

युसेनला केवळ हीच खंत होती की त्याच्या सहखेळाडूंच्या अपेक्षांना तो खरा उतरला नाही. जमैकाच्या संघातला धावपटू मॅकलॉड म्हणाला, ‘युसेन वारंवार आमची माफी मागत होता. आम्ही त्याला सांगत होतो की असं करायची गरज नाही.’