‘युवागिरी 2018’ सावईवेरेचा सख्याहरी संघ प्रथम

0
849

 

 

गोवाखबर :कोकणी चित्रपट ‘केस्ताव दि कोफुसाव ’ व ‘गोंय’ या संस्थेतर्फे आयोजित ‘युवागिरी 2018’ युवा महोत्सवात  ‘सावईवेरे सख्याहरी’ने  20हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि फिरता चषक तसेच स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र पटकाविले. युवा कला मोगी आणि चौगुले विद्यालय मडगाव याला 15हजार रुओये व प्रमाणपत्र  या स्वरुपाचे दुसरे बक्षिस तर गोवा विद्यापीठ व गणपत पार्सेकर विद्यालय हरमल   यांना तिसऱ्या क्रमांकाचे 10 हजार रुपये आणि प्रमाणपत्र  प्राप्त झाले.

यावेळी उद्घाटनप्रसंगी ‘‘केस्ताव दि कोफुसाव’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. कला आणि संस्कृती संचालनालय आणि जीएसआयडीसी यांच्या सहयोगाने आणि इमेजिन पणजी स्मार्ट सीटी डेव्हलोपमेंट लि.स्मार्ट सीटी आणि ईडीसी यांच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन केले होते. महोत्सवाचे उद्घाटन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष सिद्धार्थ कुंकळेकर, स्व. मयुरेश वस्त यांचे वडील दत्ताराम वस्त, निमंत्रक राहुल कामत, कार्याध्यक्ष रूपेश ठाणेकर आणि सहसचिव सुचिता नार्वेकर यांची उपस्थिती होती. महोत्सवाच्या समारोपप्रसंगी कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक गुरुदास पिळर्णकर, सिद्धार्थ कुंकळकर, आयनॉक्सचे महाव्यवस्थापक जोझेफ, अनिल पेडणेकर, राहुल कामत उपस्थित होते.