युवागिरीच्या स्वागताध्यक्षपदी कुंकळयेकर तर कार्याध्यक्षपदी ठाणेकर

0
1190
 गोवा खबर: युवागिरी 2018 महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी सिध्दार्थ  कुंकळयेकर तर कार्याध्यक्षपदी रुपेश ठाणेकर यांची निवड करण्यात आली आहे.
  गोव्यातील उच्च माध्यमीक विद्यालय, महाविद्यालय व सांस्कृतीक संस्थासाठी ” गोय” गॅंग ऑफ यंगस्टर्स डिचोली तर्फे “युवागिरी 2018” या युवा महोत्सवाच आयोजन करण्यात आले आहे.
3 ऑगस्ट 2018 रोजी कला अकादमी मध्ये या महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले आहे. गोमंतकीय चित्रपट संस्कृतीची तरुणांना माहिती व जागृती व्हावी या हेतूने सदर महोत्सवात कार्यक्रमांची मांडणी करण्यात आले आहे.  नुकतीच ‘गोय’ ह्या संस्थेची एक बैठक पार पडली.त्यात ईडीसीचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळयेकर यांची महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी तर युवा समाज कार्यकर्ते रुपेश ठाणेकर यांची कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यातील 14 उच्च माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालये व 6 सांस्कृतिक संस्थानी नाव नोंदणी केली आहे. या महोत्सवासाठी निवडण्यात आलेली समिती खालील प्रमाणे आहे.  सचिव राहुल कामत,
सहसचिव सुचिता नार्वेकर, खजिनदार  विभुती कामत, कार्यवाह  साईकृष्ण कामत, कार्यकारिणी समिती मध्ये संजना कळंगुटकर, पूजा फडते, रवी वाझा, प्रज्वल नाईक, लक्ष्मी बुडके, स्नेहा कोटकार, प्रेमकुमार, अल्ताफ मुल्ला, उमेश नाईक, विठ्ठल नाईक, सचिन नाईक यांचा समावेश आहे.