गोवा खबर:भंडारी समाजातील युवा शक्तीने समाजाकडून आपल्याला काय फायदा मिळू शकतो, यापेक्षा आपण समाजाच्या प्रगतीसाठी काय योगदान देऊ शकतो, याचा विचार करावा. आजकाल खेळ, स्पर्धा यात युवक मोठ्या प्रमाणात भाग घेत असला तरी हा उत्साह त्यांनी पुढे समाजकार्यासाठी वापरणे गरजेचे आहे. समाजापुढे अनेक आव्हाने असली तरी युवा शक्ती जोमाने कार्यरत झाल्यास अशक्य आव्हाने आम्ही सहजपणे पार करू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
येथील तिसवाडी तालूक्याच्या गोमंतक भंडारी समाज आणि युवा समितीतर्फे ताळगाव समाजगृहाशेजारी ‘साग’ मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रीकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरणावेळी प्रमुख पाहुणे नाईक व अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर नगरविकास मंत्री मिलींद नाईक, माजी आमदार दयानंद मांद्रेकर, किरण कांदोळकर, व्यंकटेश नाईक , अशोक नाईक, सामाजिक कार्यकर्ता दत्तप्रसाद नाईक व आदी मान्यवर उपस्थि होते.
गोमंतक भंडारी युवा समितीच्या सहकार्याने गोमंतक भंडारी समाज तळीगाव क्रीडा मैदानावर एक दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. सुमारे 17 संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. अंतिम सामन्यात चोडनचे टीम तलीगांवचा पराभव केला आणि विजेते बनले.
टेनिस बॉल क्रीकेट स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे: विजेता:चोडण ग्राम समिती, उपविजेता:ताळगाव ग्राम समिती.उत्कृष्ठ गोलंदाज: दिनेश नाईक, उत्कृष्ठ फलंदाज: अनुप नाईक यांनाही पारितोषिक देण्यात आले.