युवकांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवणार:कामत

0
1221
श्रेया धारगळकर यांची प्रदेश महिला आघाडी प्रमुखपदी निवड जाहिर
गोवाखबर:सरकार स्वंयरोजगाराबद्दल केवळ भाषणं करण्यात धन्यता मानत आहे.प्रत्यक्षात मात्र सरकार युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात सपशेल अपयशी ठरले आहे.  शिवसेनेच्या माध्यमातून  स्वयंरोजगार मोहिम सुरू करून युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी दिली आहे.
कामत म्हणाले, आज गोव्यात बाजारपेठा आणि मोठे उद्योग हे परप्रांतीयांच्या हातात गेले आहेत. मायनिंग किंवा टँक्सी व्यवसाय ज्याच्यात फक्त गोमंतकिय आहेत तो व्यवसायही हे गोयकारपणाची भाषा करणारे सरकार बलाढ्य परप्रांतीय उद्योगपतींच्या घशात घालण्याचे षडयंत्र रचत आहे. नोकरी मागणाऱ्या युवकांपेक्षा नोकरी देणारे युवक घडविण्याची गरज असून तसे झाले तरच पुढील पिढ्यांसाठी गोंयकारपण टिकेल असे मत कामत यांनी व्यक्त केले.
शिवसेना सर्व उद्योग कंपन्याना आवाहन करून गोव्या बाहेरिल लोकांकडून करून घेतली जाणारी कामे फक्त भुमीपुत्रांनाच मिळवून देण्यासाठी शिवसेना आपली ताकद लावणार असल्याचे सांगून कामत म्हणाले, असे निदर्शनास आले आहे की जवळ जवळ सर्वच मोठ्या कंपन्या  विविध कंत्राटे  एक तर परप्रांतीयांना किंवा थेट परप्रांतात देतात. किती तरी कंपनीमध्ये वेंडर डेव्हलपमेंट विभाग असतो पण त्याची माहिती गोमंतकातील युवकांपर्यत पोचत नाही. आम्ही संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून वेंडर संबधित माहिती एकत्रित करून गोव्यातील इच्छुक युवकांना पर्यंत पोचवणार आहोत. गोव्यातील इच्छुक युवकांनीही आमच्याकडे संपर्क साधून नोंदणी करावी असे आवाहन कामत यांनी केले. सरकारलाही जर गोव्यातील युवकांचे हित सांभाळायचे असल्यास सर्व सरकारी आस्थापनातील परप्रांतीय उद्योगपतींना दिलेल्या लिजीस रद्द करून गोव्यातील युवकांना उद्योग सुरू करण्यासाठी मदत करावी. गोवा पर्यटन महामंडळाने सर्व होटल्स व अन्य जागा परप्रांतीय उद्योगपतींच्या घशात घातली आहेत. कळंगुट समुद्र किनार्‍यावरील रेसिडेन्सी सुध्दा देऊन टाकली याबद्दल कामत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मेडीकल कॉलेज,इफ्फी बांधकाम विभाग, पुल,  रस्ते बहुतेक कंत्राटदार परप्रांतीय का असतात असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
यावेळी बोलताना राज्य सरचिटणीस मिलिंद गावस म्हणाले,  बांधकाम , जलस्रोत खाते, साधनसुविधा महामंडळ व ईतर सरकारी आस्थापनातील कंत्राटे मिळवण्यात केरळ व अन्य प्रांतियांचे वर्चस्व आहे.  गोमंतकिय कंत्राटदाराला डावलून केरळ किंवा अन्य प्रांतीय कंत्राटदाराला यापुढे कंत्राटे दिल्यास शिवसेना काम बंद पाडणार असा इशारा गावस यांनी दिला.
मटका,जुगाराविरोधात लढा उभारणार-धारगळकर
शिवसेना नेते तथा गोवा प्रभारी खासदार संजय राऊत  यांनी शिवोली येथील समाज सेविका श्रेहा धारगळकर यांची महिला आघाडी प्रमुखपदि नेमणूक केली असल्याचे कामत यांनी यावेळी जाहीर केले. मुंबई येथे दैनिक सामना कार्यालयात राऊत साहेबांची भेट घेऊन त्यांना पद देण्यात आले अशी माहिती कामत यांनी दिली.
शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात शिवसेनेच्या प्लास्टिक बंदीच्या धाडसी निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
पत्रकार परिषदेस सरचिटणीस मिलींद गावस, महिला संपर्क प्रमुख रीया पाटील, सचिव अमोल प्रभुगावकर, मंदार पार्सेकर, वंदना चव्हाण, ईरफान खान, उत्तर जिल्हा प्रमुख किशोर राव, युवा विभाग संघटक चेतन पेडणेकर, रजनी वेळुस्कर, मतदाता सर्वेक्षण समन्वयक झायगल लोबो हजर होते.