युवकांचे नैराश्य ग्रासण्यापासून संरक्षण करण्यासाठी कुटुंब व्यवस्था हे सर्वोत्तम औषध:उपराष्ट्रपती

0
1018
The Vice President, Shri M. Venkaiah Naidu with the Faculty Members of Presidency College, on the occasion of their Annual Convocation, in Chennai on October 11, 2018. The Minister for Fisheries and Personnel and Administrative Reforms, Tamil Nadu, Shri D. Jayakumar and other dignitaries are also seen.

 

गोवा खबर:युवकांचे नैराश्य ग्रासण्यापासून संरक्षण करण्यासाठी कुटुंब व्यवस्था हे सर्वोत्तम औषध असल्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज चेन्नई येथे इथिराज महिला महाविद्यालयाच्या 70व्या वर्धापन दिन समारंभात बोलत होते.  

पितृसत्ताकमूलतत्ववादकट्टरतावाद यावर महिलांच्या शिक्षणाशिवाय दुसरा सर्वोत्तम उतारा नाहीअसे उपराष्ट्रपती म्हणाले. समाजाच्या सक्षमीकरणासाठी मुलींना शिक्षण देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. लिंग असमानतेबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी कठोर कारवाईचे आवाहन केले.