युपीत काँग्रेसने सुरू केली ‘स्टेट बँक ऑफ टोमॅटो’

0
1091

शंभरीच्या खाली येण्यास तयार नसलेल्या टोमॅटोने सर्वसामान्यांची पूर्ण पंचाईत केली आहे. टोमॅटोचा पुरवठा सुरळीत होण्यास सप्टेंबरच्या मध्यापर्यंतचा काळ लागणार असल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत. घरच्या ताटातून टोमॅटो जसे गायब होत आहेत तसेच ते हॉटेल आणि खाद्यठेल्यांवरूनही गायब होत आहेत. यामुळं टोमॅटोचा ट्रक चोरीला गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. टोमॅटोच्या या वाढलेल्या किंमतीचा निषेध करण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत लखनऊ काँग्रेसने शहरात ‘स्टेट बँक ऑफ टोमॅटो’ ही बँक सुरू केली आहे.सर्वसामान्य बँकेत मिळणाऱ्या सुविधा या बँकेत मिळतील मात्र या बँकेतील सर्व गोष्टी या टोमॅटोशी निगडीत असणार आहेत. टोमॅटोवर कर्ज, टोमॅटो डिपॉझिट करणं,टोमॅटोसाठी लॉकर या सारख्या सुविधा काँग्रेसने सामान्य नागरिकांना दिल्या आहेत. तसेच या बँकेत टोमॅटो डिपॉझिट केल्यास सहा महिन्यांनी पाच पट टोमॅटो देखील मिळणार असून टोमॅटोवर ८० % टक्के कर्ज मिळणार मिळणार असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलं.