‘यिम्बी’ तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणारे कचरा व्यवस्थापन

0
704

 

 

  • यिम्बी हे भारतातील पहिले कचरा व्यवस्थापनाचे शॉप आहे जे की ग्राहकांना सर्व सोयी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते.
  • चांगल्या उत्पादनाद्वारे, सेवेद्वारे आणि प्रकल्पांद्वारे कचऱ्याच्या समस्येवर अंकुश ठेवणे हा उद्देश आहे,मग तो घनकचरा असो वा द्रव कचरा.
  • अनेक सामाजिक -पर्यावरणीय उपक्रम राबवते,जसे की किनाऱ्यांची स्वच्छता,खत बनविणे,शाश्वतता इ बाबत कार्यशाळा आयोजित करणे.

 

 गोवा खबर: अनेक वर्षांपासून पर्यावरण संरक्षण हा महत्त्वाचा विषय बनला आहे,आणि पर्यावरण पूरक,टिकाऊ आणि  जैव विघटनशील उत्पादने बनवण्यात यावीत अथवा अशीच उत्पादने वापरावीत याकरीता आक्रोश केला जात आहे.कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि कचरा व्यवस्थापनाची समस्या वाढली आहे,पण सध्याच्या घाई गडबडीच्या आयुष्यात आपण या समस्यांकडे दुर्लक्ष करतो.पण सुदैवाने काही थोड्या लोकांना या समस्येची गंभीरता कळाली असून ते नव नवीन कल्पनांद्वारे लोकांमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत, या कल्पना केवळ व्यतिगत फायद्यासाठी नसून विविध उद्योगधंदे आणि कंपन्यांसाठीही उपयुक्त आहेत.

त्यामुळे केवळ गोव्यातील नव्हे पूर्ण भारतातील पहिले कचरा व्यवस्थापन कंज्युमर ब्रँड असणारे यिम्बी हे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार कचरा व्यवस्थापनामधील विविध उत्पादने व सेवा उपलब्ध करून देते.मग तो घनकचरा असो वा द्रव कचरा.

यिम्बी चा फुल फॉर्म ‘येस इन माय बॅक यार्ड’ असा आहे.गोव्याच्या गौरव पोकळे यांनी स्थापन केलेल्या इनोवेटीवा वेस्ट एड अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या गोवन स्टार्ट अप कंपनीने हा ब्रँड आणला आहे.

याविषयी बोलताना गौरव पोकळे म्हणाले की “भारतातील पाहिले कचरा व्यवस्थापन ग्राहक केंद्र झाल्याने आम्ही खूप आनंदी आहोत आणि आम्हाला आशा आहे की या उपक्रमाद्वारे आम्ही जागृती निर्माण करण्यासोबतच आमची शाश्वततेविषयी असणारी कल्पना संपूर्ण देशभरात राबविणार आहोत.आपल्या देशात वाढ होत असून आपण एक देश म्हणून एका चांगल्या आणि आत्मनिर्भर भविष्याकडे जात आहोत.”

इनोवेटीवा वेस्ट एड अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही एज ध्येयवादी कचरा व्यवस्थापन कंपनी असून घन आणि द्रवकचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कल्पक आणि प्रभावशाली तोडगे पुरविते.या कंपनीकडे कचरा गोळा करण्यापासून ते कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीची सर्व सामग्री आहे,या प्रक्रियेमुळे ग्राहकांचा वेळ वाचतो त्यामुळे त्यांना त्यांची सेवा मिळवण्यासाठी इतर अनेक पुरवठादारांसोबत संपर्क साधावा लागत नाही.

तुमच्या सर्व कचऱ्याचे एकाच पुरवठादाराकडून विल्हेवाट लावली जात असल्याने पैशाची बचत होऊन तुम्हाला कमी दरात ही सेवा मिळते.तुमच्या रिसायकल केलेल्या कचऱ्यासंबंधित सर्व आकडेवारीचे विश्लेषण हे सहज आणि सोप्या पद्धतीने एकच ठिकाणी तयार केले जाते.

विविध पर्यावरण पूरक साधने एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी इतर कोणत्याही दुकानासारखेच  वायआयएमबीवाय हे देखील एक दुकान आहे.येथे तुम्हाला बागासी क्रोकरी,टूथब्रश,लाकडी कटलरी,पाण्याच्या बाटल्या, कॉटनच्या पिशव्या मिळतात त्याशिवाय येथे कंपोस्टर आणि कंपोस्ट उत्पादनेही उपलब्ध आहेत.

या दुकानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे दुकान पूर्णपणे पर्यावरण पूरक साहित्यापासून बनविले आहे.

यिम्बी हे केवळ व्यक्तीसाठी काम करते असे नाही तर त्याशिवाय हाऊसिंग कॉम्प्लेक्स, कमर्शियल बिल्डिंग, उद्योगधंदे आणि शहर भागातील स्थानिक स्वराज्य संस्था साठीही काम करते.ही कंपनी कचरा व्यवस्थापन आणि रिसायलिंग करीता परवडण्याऱ्या, शाश्वत आणि लवचिक उपाय योजना करते.याशिवाय यिम्बी विविध पर्यावरण पूरक अभियान राबवते.याशिवाय विद्यार्थ्यांना पर्यावरण जतनाचे महत्व पटवून देण्यासाठी डाऊन टु अर्थ यांच्या सोबत विविध अभियान राबविते.डाऊन टु अर्थ संस्थेने समुद्र किनारा स्वछता अभियान राबविले आहे त्याशिवाय त्यांनी कंपोस्टिंग आणि इतर विषयांवर कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

यिम्बीचा उद्देश केवळ कचऱ्यावर प्रक्रिया करणे हा नाही.यासोबत कचरा कमी करणे आणि शाश्वत भोवताल हा ही आहे.

व्यक्ती आणि संस्थांना शिक्षित,प्रशिक्षित करून,त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी यिम्बी विविध प्रकारचे उपक्रम हाती घेते आणि याद्वारे ही कंपनी उज्वल भविष्याकडे झेप घेत आहे.