यंदा चांगला पाऊस पडणार!

0
901
गोवाखबर:भारतात यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचे तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकरी आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. तर अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल.
यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असे स्कायमेटने नमूद केले आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल. विशेष म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के म्हणजे काहीच नाही असा वर्तवण्यात आला आहे.