यंदाचा इफ्फी प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने होणार साजरा

0
155

 

20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर ऐवजी 16 ते 24 जानेवारी, 2021 दरम्यान होणार इफ्फी

गोवा खबर:भारताच्या 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ( 51वा इफ्फी)यंदा गोवा येथे 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर, 2020 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले होते. मात्र हा महोत्सव आता पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन कार्यक्रमानुसार आता  16 ते 24 जानेवारी, 2021 या काळामध्ये हा चित्रपट महोत्सव भरविण्यात येणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या मार्गदर्शक सूचना आणि शिष्टाचार लक्षात घेवून  16 ते 24 जानेवारी,2021 या काळात या महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आला आहे. कोविड-19 महामारीचा उद्रेक लक्षात घेवून यंदा हा महोत्सव संयुक्त स्वरूपामध्ये म्हणजे प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. अलिकडच्या काळामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांप्रमाणे कोविड-19 संबंधित सर्व नियम यावेळी काटेकोरपणे लागू करण्यात येणार आहेत.