यंदाचा अंचिम हा अतिशय खास ;अंचिम प्रतिनिधी

0
368

अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील दुसरा दिवस

गोवा खबर:गोव्यात यंदा ५० वा आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (अंचिम) २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जात आहे.  अंचिम महोत्सवाचे सुर्वण वर्ष असल्याने गोवा सरकारने हा महोत्सव संस्मरणीय करण्यासाठी नव-नवीन आकर्षण योजलेले आहे. जगात वेगवेगळ्या भाषा आहे पण सिनेमाची एकच भाषा ती म्हणजे कला जी सर्व भाषांना सामावून घेते.  

अंचिमच्या दुसर्‍या दिवशी कला अकादमीमध्ये काही अंचिम प्रतिनिधींशी हितगुज केली असता त्यांनी अंचिमविषयी काही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तमिळनाडू येथील ऐश्वर्या रमेश या महिला प्रतिनिधिनी सांगितले की आपण प्रत्येक वर्ष अंचिमला येते पण  यंदाचा अंचिम हा अतिशय खास आहे. यंदा सुर्वण महोत्सव असल्याने अनेकविध नवीन उपक्रम आहे. आपण या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असते. गोवा हे आपले लोकप्रिय स्थळ आहे आणि अंचिम हे गोव्याचे कायम क्रेंद्र असल्याने तिला अधिक आनंद होत असल्याचे सांगितले. आनंद नायक या अंचिम प्रतिनिधीने सांगितले की अचिंममध्ये अभिनेत्यांना भेटण्याची संधी मिळते व त्याचबरोबर त्यांची प्रकट मुलाखत ऐकणे आपल्याला अधिक आवडते.

कला अकादमीच्या काही अंतरावर असलेल्या बालोद्दानामध्ये लहान मुलांसाठी विशेष आकर्षण केले होते. लहान मुलांच्या चित्रपटाची अभिरूची लक्षात घेऊन मुलांसाठी चित्रपट दाखविण्याची सोय केली आहे. त्याचबरोबर लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी कार्टूनसच्या प्रतिमा उदा. क्रिश, बॅटमन इत्यादी उभारलेले आहेत. तिथे असलेले आकर्षक देखावे व पाण्याचे नेत्रदीपक फवारे सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

त्यानंतर, पणजीच्या फुटपथावर सजलेले विविध प्रकारचे स्टॉलस हे अंचिम रसिक व रसत्यावरील प्रवाशांमध्ये आकर्षण निर्माण करते. यामध्ये गोवा कॉलेज ऑफ आर्टस यांचे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांनी आपली विविध कला सादर केली आहे. उदा. हस्तनिर्मित टॅग, बुकक्राफ्ट, स्ट्रीट इल्यूजन, कॅनव्हास पेंटीग, स्पॉट स्कॅचिंग, पेंटीगच्या मार्फत गोव्याचे माजी मुख्यमंत्री व संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर व हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ सिने अभिनेत्री श्रीदेवी यांना आंदराजली प्रकट केलेली आहे. अंचिम हे कला सादर करण्यासाठीचे या विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ बनले आहे. काही गोव्यातील स्वंय साहाय्य गटाच्या माध्यमातून गोव्याचे पारंपरिक खाद्दपदार्थ स्टॉही उभारलेले आहे. जी खव्वयांसाठी पर्वणीच बनलेली आहे.

एकदंरीत गोव्यामधील अंचिममुळे सगळीकडे चैतन्यपूर्ण वातावरण बनलेले आहे. भारतामधील चित्रपटाबरोबरच जागतिक पातळीवरचे दर्जेदार चित्रपट पाहण्याची व संवाद साधण्याची संधी चित्रपट रसिकांना या अंचिमद्वारा लाभते.