यंग शेफ ऑलिम्पियाड २०२० – गोव्यात प्रथमच आयोजन!

0
836

 

गोवा खबर : यंग शेफ ऑलिम्पियाड २०२० या जगातील सर्वोत मोठ्या पाककृती स्पर्धेच्या गोव्यातील पहिल्यावहिल्या आयोजनासाठी गोवा सज्ज झाले आहे. यंदाच्या वर्षी या स्पर्धेत सहभागी झालेल्या ५५ देशांपैकी १० देशांतील स्पर्धकांसाठी यजमानपद गोव्यातील आयआयएचएमतर्फे भूषविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी शेफ शॉन केनवर्दी, शेफ स्टिफन हॉगन, शेफ स्टुअर्ट लिटिलजॉन, डॉ. डेव्हिड ग्रॅहेम आणि असे अनेक परीक्षक सहभागी होणार आहेत.

 

‘यंग शेफ ऑलिम्पियाड’ या हॉस्पिटॅलिटी जगतातील सर्वात मोठ्या पाककृती स्पर्धेच्या ६ व्या पर्वाचे आयोजन २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२० या कालावधीत दिल्ली, बंगळुरू, पुणे, गोवा आणि कोलकाता या शहरांमध्ये करण्यात आले आहे. पाच दिवस सुरू राहणाऱ्या या स्पर्धेत ‘शेफेस्टंट्स’साठी कठीण आव्हानांच्या तीन फेऱ्या असणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना १०,००० डॉलर रोख, चषक आणि गोल्ड टोक (सोन्याची शेफची टोपी) ही बक्षीसे मिळणार आहेत.

गोव्यातर्फे काही देशांसाठी यजमानपद भूषविण्यात येणार आहे. त्यापैकी सिंगापूरसारख्या काही देशांनी या पूर्वी वायसीओ ही प्रतिष्ठीत स्पर्धा जिंकली होती. शेफ स्टुअर्ट लिटिलजॉन आणि शेफ स्टिफन हॉगन हे गोव्यातील स्पर्धेचे तांत्रिक परीक्षक असणार आहेत. आंतरराष्ट्रीय शेफ डेव्हिड ग्रॅहॅम आणि शेफ अविजीत घोष हे या शहरात होणाऱ्या स्पर्धेचे सादरीकरण परीक्षक असणार आहेत.

“शाश्वतता ही वायसीओ २०२० या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना आहे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी जग हे अधिक चांगले कसे करावे हे जगाला दाखविण्याचे या जगातील सर्वात मोठ्या पाककृती स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. “वायसीओ लोकांना एकत्र आणते आणि वायसीओ २०२० चे सर्वात मोठे यश म्हणजे या निमित्ताने जगातील तरुण एका व्यासपीठावर एकत्र येतील. शाश्वतता ही वायसीओ २०२० ची मध्यवर्ती संकल्पना आहे. जागतिक पातळीवर आम्ही या एकाच महत्त्वाच्या गोष्टीची आम्हाला अपेक्षा आहे. शाश्वततेची आत्ताच काळजी घेतली नाही तर भविष्यात आपल्या सर्वांनाच त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. यंदाच्या वर्षीपासून वायसीओमध्ये एका महत्त्वाच्या शैक्षणिक घटकाचा समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा केवळ पाककौशल्याविषयी, पाककृतींच्या सादरीकरणापुरती मर्यादित नाही तर ही स्पर्धा शाश्वततेबद्दल आणि तुमच्या देशात हा घटक कसा भिनवू शकता हासुद्धा या स्पर्धेचा हेतू आहे.”, असे आयएचसीचे सीईओ आणि वायसीओचे संस्थापक डॉ. सुबोर्नो बोस पत्रकार परिषदेत म्हणाले.

भारतीय स्पर्धक :

वायसीओ २०२० मध्ये आयआयएचएम हैदराबादमधील हुशार व गुणवान वरूण तेज रेड्डी हा भारतातील स्पर्धक आहे. बँकॉकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्टार शेफ २०१९ मध्ये त्याने आयआयएचएमचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याच्यासोबत शेफ क्लेमेंट डिक्रुझ हे मेंटर (मार्गदर्शक) असणार आहेत. ऑलिम्पियाडसाठी परिपूर्ण पदार्थ तयार करण्यासाठी आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी ते वरूणला प्रशिक्षित करणार आहेत.

कार्यक्रमाचा फॉरमॅट

गोव्यातील  आयआयएचएममध्ये ३० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता खास गोव्याच्या शैलीतील स्वागत समारंभाने या ऑलिम्पियाडची सुरुवात होईल. या स्पर्धेची पहिली फेरी सकाळी ९ वाजता सुरू होईल आणि या फेरीला अर्ध्या तासाची मर्यादा असेल. या फेरीमधील खाद्यपदार्थ चाखताना परीक्षकांना देशाचे नाव वा स्पर्धकाचे नाव सांगण्यात येणार नाही. या स्पर्धेची दुसरी फेरी ३१ जानेवारी रोजी होईल आणि या फेरीलाही हेच नियम लागू असतील.

त्यानंतर स्पर्धक १  फेब्रुवारी २०२० रोजी  आयोजित होणाऱ्या अंतिम फेरीसाठी कोलकात्याला जातील. २ फेब्रुवारी २०२० रोजी सांगता समारंभात विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येतील.

पुरस्कार :

वायसीओ २०२० विजेता

१ ला उपविजेता

२ रा उपविजेता

प्लेट ट्रॉफी

सर्वोत्तम शाकाहारी पदार्थ

सर्वोत्तम गोड पदार्थ

सर्वोत्तम हायजीन प्रॅक्टिस

रायझिंग स्टार पुरस्कार