म्हापशात आपतर्फे ऑक्सीजन तपासणी केंद्र सुरु

0
130
गोवा खबर : आम आदमी पक्षाने संपूर्ण गोव्यात ऑक्सिजन तपासणी केंद्रे सुरू केली आहेत, जिथे लोक सहजरित्या जाऊन ऑक्सिजन संपृक्तता पातळी तपासू शकतात आणि त्यानुसार जंगलातील आगीसारख्या पसरणार्‍या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाऊ शकते.
सध्या आम्ही २४० ऑक्सिजन तपासणी केंद्रे सुरू केली असून लवकरच ती ३०० पर्यंत वाढविली जातील.
आप कार्यकर्त्यांच्या ठिकाणी ही केंद्रे उभारली गेली आहेत आणि केंद्राची ओळख पटवण्यासाठी बॅनर लावले आहेत. जर ऑक्सिजन संपृक्तता पातळी ९५ च्या खाली असेल तर संबंधित व्यक्तीस सल्ला घेण्यासाठी वैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधावा लागेल.
हे लक्षात घ्यावे की, जेव्हा ही केंद्रे प्रथम कुंकोली आणि फातोर्डा येथे सुरू झाली तेव्हा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी त्यांना अडथळा आणला आणि लोकांना विनाशुल्क पुरविली जाणारी सेवा था थांबवाली.
“आता ही सेवाही विनामूल्य आहे आणि ज्यांना थोडाशी अस्वस्थता जाणवत असेल त्यांना येऊन ऑक्सिजन पातळीची तपासणी घेता येईल,” असे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी  या केंद्रांचा वापर करण्याचे आवाहन करतना सांगितले.
कर्फ्यूच्या पहिल्या दिवसापासून गृह विलगीकरणात असलेल्या रूग्णांना ऑक्सिमीटरचे वितरण,शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांना जेवण पुरवल्यानंतर, गोव्यातील लोकांसह कोरोनाशी लढण्याचा हा आणखी एक उपक्रम आहे.