म्हादई नदी मुद्द्यावर पर्रीकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी

0
1188

पर्रीकर यांचे म्हादई नदी मुद्द्यावरील मौन पूर्ण राज्यासाठी आश्चर्याची गोष्ट ठरत आहे. कर्नाटकचे अध्यक्ष येडियुरप्पा यांना लिहिलेल्या पत्राबद्दल सार्वजनिकरित्या जाहीर केल्यानंतर मात्र ही द्विपक्षीय बैठक कधी होईल याबद्दल मात्र कोणतीही घोषणा केली नाही. कर्नाटकला पाणी देण्याच्या या सरकारच्या निर्णयाविरोधात असणाऱ्या सर्व संस्था आणि कार्यकर्त्यांसोबत शिवसेना अखंडपणे उभी राहिली आहे. गोव्याच्या हक्काच्या पाण्याचा एकही थेंब शिवसेना दुसरीकडे जाऊ देणार नाही. अनेक टीकांना सामोरे जाऊ लागल्यानंतर राज्याच्या हिताविरोधात कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी भूमिका पर्रीकर यांनी घेतली होती. दुसरीकडे राजकीय तडजोडीस तयार असल्याचे त्यांचे सहकारी विजय सरदेसाई यांचे म्हणणे होते. या दोन्ही भूमिका परस्परविरोधी असून यामुळे राज्यातील जनता मात्र प्रश्नांत पडली आहे. कर्नाटक सरकार आणि पर्रीकर यांची म्हादई नदीवरील चर्चेकरिता बीअथक नेमकी कधी होणार आहे हा प्रश्न शिवसेना उपस्थित करते. हि बैठक झाली का ? कर्नाटक सरकारला पाणी देण्याचे आश्वासन पडद्यामागून दिले गेले आहे का ? अशी शंकाही शिवसेना उपस्थित करते. यावर पर्रीकर यांनी लवकरात लवकर खुलासा द्यावा. राज्य सरकारचे कायदेशीर सल्लागार आत्माराम नाडकर्णी यांच्या अभ्यासानुसार ०.१ टी एम सी इतक्या पाण्याची आवश्यकता आहे, याचा अर्थ कर्नाटकला पाणी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे असा घ्यायचा का…? येडियुरप्पा यांना सार्वजनिकरित्या पत्रं दिले गेले तर पाठपुरावा करणारी पत्रं अशी पडद्यामागून का दिली जात आहेत…? शिवसेना पर्रीकर यांना आवाहन करते की त्यांनी या मुद्द्यावर माध्यमे आणि लोकांसमोर येऊन अथवा सार्वजनिक पत्राद्वारे आपली खरी भूमिका स्पष्ट करावी. ही केवळ शिवसेनेचीच नाही तर पूर्ण गोव्याच्या जनतेची मागणी आहे.

राखी प्रभुदेसाई नाईक
शिवसेना प्रवक्त्या- गोवा