मोरजीत चरस बाळगल्या प्रकरणी हिमाचलच्या युवकास अटक

0
73
गोवा खबर:पेडणे पोलिसांनी मंगळवारी दुपारी मोरजी येथे धाड टाकून 34 हजारचा चरस बाळगल्या प्रकरणी हिमाचल प्रदेश मधील युवकाला अटक केली.
पेडणेचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी आणि पथकाने मंगळवारी दुपारी उर्मालबाग-मोरजी येथे टाकलेल्या धाडीत टिकरी-हिमाचल प्रदेश येथील चंदर मणी याला अटक केली.
त्याच्याकडे 34 हजार रूपयांचा चरस आढळून आला.चंदर वर अमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याची पोलिस कोठडीत रवानगी गेली आहे.चरस त्याने कोणाकडून आणले याची चौकशी पेडणे पोलिस करत आहेत.