मोपा विमानतळाला बांदोडकरांचे नाव द्या-मगोची मागणी

0
1085

मोपा येथे होउ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यायला हवे असे मत मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी फर्मागुड़ी येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ढवळीकर यांनी हे मत व्यक्त केले. मगो पक्षाची ही मागणी सरकार समोर ठेवून त्याचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.