मोदी यांनीआयुष मंत्रालय स्थापन करून भारतीय औषधं पद्धतीकडे नव्या नजरेने पाहण्याचे काम केले:नाईक

0
564

गोवा खबर:हजारो वर्ष व पुरातन काळापासून भारतीय औषधं पद्धत फक्त भारतात प्रसिद्ध आहे. मात्र सुमारे 60- 65 वर्षे या पद्धतीकडे आम्हीच दुर्लक्ष केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाची पावले ओळखून, सत्तेवर आल्यावर सहा महिन्यात आयुष नावाचे नवे मंत्रालय स्थापन करून भारतीय औषधं पद्धतीकडे नव्या नजरेने पाहण्याचे काम केले. आज मोदी यांच्या या दूरदृष्टीमुळे आयर्वेद, योग व अन्य भारतीय औषधंकडे नव्या दृष्टीने जग आकर्षित होत आहेत.  योग दिन आज जगातील 200हुन अधिक देशात पाळला जात असल्याचे केंद्रीय आयुष्यमंत्री आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

कोरोना सारख्या महामारीला भारतीय औषधं उपचार पद्धतीने नियंत्रण येऊ शकते.अजूनही कोरोनावर परिणामकारक लस वा औषधं आलेली नाही.  मात्र, काही लोक आयुष्य मंत्रालयाकडून कोरोनाविरुद्धची औषधं शास्त्रीय प्रमाण नसल्याचे कारण देऊन कमी लेखण्याचे काम करत आहेत. भविष्यात ही शाश्त्रीय मान्यताही आयुष्य औषधंना मिळेल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.

ढवळी – फोंडा येथील माधवबाग ‘ संस्थेची ” वेदिक डीलाइट ” आस्थापनाचे उदघाटन मंत्री नाईक यांच्याहस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी माधवबाग चे प्रमुख दीपक कुलकर्णी, माजी खासदार नरेंद्र सावईकर, कवळे पंचायतचे सरपंच राजेश कवळेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.