मोदी मंत्रिमंडळामध्ये ९ नव्या चेहऱ्यांना संधी

0
1020

केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार आज अखेर झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण १३ जणांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मागील तीन वर्षांच्या कार्यकाळात भरीव कामगिरी करणारे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, ऊर्जामंत्री पियूष गोयल, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन व संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली आहे. तर, एकूण ९ नव्या चेहऱ्यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या घटकपक्षांनाही सामावून घेतले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. नव्या विस्तारात एकाही मित्रपक्षाला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. राज्यमंत्री म्हणून चार सनदी अधिकाऱ्यांना मिळालेली संधी हे या विस्ताराचं वैशिष्ट्य ठरलं आहे. नव्या मंत्र्यांचं खातेवाटप आजच जाहीर होण्याची शक्यता असून खांदेपालटात संरक्षण व रेल्वेमंत्रीपद कोणाला मिळते, याबद्दल उत्सुकता आहे.

SHARE
Previous article
Next article