डोकलाम मुद्द्यावर भारताला धमकावण्याची एकही संधी चीन सोडत नाही. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमधून भारतावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. चीनने म्हटले आहे, की मोदी आमच्याबद्दल कडक भूमिका घेऊन आपल्या नागरिकांच्या भविष्यासोबत खेळ करत आहे. ते भारताला युद्धाच्या खाईत लोटत आहेत. मोदींना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ताकदीचा अंदाज असला पाहिजे, आम्ही डोकलाममधील भारतीय सैन्याला नेस्तनाबूत करु शकतो.
डोकलाममध्ये छोटेखानी ऑपरेशनची चीनची तयारी​
सिक्कीम सेक्टरमध्ये डोकलाम परिसरात दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या भारत-चीन सीमावादावर चीनच्या एका तज्ज्ञाने म्हटले आहे, की चीनकडून एक छोटे मिलिटरी ऑपरेशन केले जाण्याची शक्यता आहे. तज्ज्ञाचे मत आहे, ‘चीन डोकलाममध्ये फार दिवस वाद चालू देणार नाही. भारतीय सैन्याला माघारी धाडण्यासाठी 2 आठवड्यांचे मिलिटरी ऑपरेशन केले जाऊ शकते.’
ऑपरेशन आधी भारताला सतर्क करणार चीन
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या शनिवारच्या अंकात चीनी एक्सपर्ट हू झियॉन्ग यांनी लिहेल्या लेखात दोन आठवड्यांच्या ऑपरेशनचा उल्लेख करण्यात आला आहे.
‘मिलिटरी क्लॅशेस पॉसिबल एज बॉर्डर स्टॅंडऑफ ड्रॅग्स ऑन’ हे ग्लोबल टाइम्स मध्ये प्रकाशित लेखाचे शिर्षक आहे.
डोकलाम वादावर गेल्या 24 तासांत 6 मंत्री आणि काही संस्थांच्या वक्तव्यानंतर छोटेखानी कारवाईची शक्यता चिनी तज्ज्ञाने व्यक्त केली आहे.
हू झियॉन्ग हे शंघाई अॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे रिसर्च फेलो आहेत. त्यांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार चीन आपले ऑपरेशन सुरु करण्यापूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती देईल.