मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवाभावी उपक्रमा बाबत काँग्रेसने जनतेची दिशाभूल करू नये:भाजप

0
417
 गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्त भाजप तर्फे राज्यभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहेत.कोविड संकटाच्या काळात सेवाभावी कार्यक्रम करून जनतेची मदत केली जाणार आहे.काँग्रेसकडे करण्यासारखे काही नसल्याने त्यांना पत्रकार परिषद घेऊन निराधार  आरोप करावे लागत आहे.काँग्रेसने लोकांची दिशाभूल करण्याचे थांबवून इतर जनसेवेची कामे करावीत,असा सल्ला भाजपचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी काँग्रेस नेत्यांना दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त भाजप तर्फे राज्यभर सेवा सप्ताह आयोजित करून सेवाभावी कार्यक्रम राबवले जात आहेत.त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कोविड संकटाच्या काळात पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करण्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
त्याला आज भाजपने उत्तर दिले.उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष महानंद अस्नोडकर आणि सांगेचे माजी आमदार तथा प्रवक्ता सुभाष फळदेसाई यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने निराधार आरोप करून लोकांची दिशाभूल करु नये,असा सल्ला दिला.
फळदेसाई म्हणाले,कोविड संकट काळात अगदी सुरूवाती पासून भाजपचे कार्यकर्ते,पदाधिकारी आणि नेते लोकांच्या मदतीसाठी धावून जात आहेत.जीवनावश्यक वस्तू, प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या गोळ्या वाटप करून भाजपने लोकांना मदतीचा हात दिलेला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यमंत्री विश्वजीत राणे कोविड संकट काळात जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिवस रात्र झटत आहेत,असे सांगून फळदेसाई म्हणाले,आम्हाला कोविड संकटावर मात करण्यासाठी कुठल्या मॉडलची गरज नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित भाजपतर्फे आयोजित कार्यक्रमांची माहिती देताना फळदेसाई म्हणाले,आम्ही 70 दिव्यांग बांधवांना गरजेची उपकरण वाटणार आहोत.रक्ताचा तूटवडा लक्षात घेऊन 70 तरुण कार्यकर्ते रक्तदान करणार आहेत.प्लाज्मादान व्हावे यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत.परिसर प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी साफसफाईची काम सेवा सप्ताहात केली जाणार आहे.
कोणताही जल्लोष न करता लोकांची सेवा करणारे उपक्रम राबवले जाणार असल्याने काँग्रेसने निराधार आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याची काम बंद करावीत,असेही फळदेसाई यांनी स्पष्ट केले.