मोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठी गोव्यात कोळसा हब करण्याचा भाजपचा डाव :गिरीश चोडणकर

0
369

 

गोवा खबर: गोव्यातील डाॅ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील डिफेक्टीव भाजप सरकार केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठी गोव्यात कोळसा हब करण्याचा प्रयत्न करीत आहे. काॅंग्रेस पक्ष जनतेचे आरोग्य व निसर्गाचे रक्षण करण्यास वचनबद्ध असुन, गोव्याच्या पर्यावरणाला मारक ठरणारे प्रकल्प राबविण्यास आमचा संपुर्ण विरोध आहे, असे काॅंग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे. 

केंद्र व राज्यातील भाजप सरकारला आम्ही गोव्याचा नाश करण्यास देणार नाही. या सुंदर भूमिचे कोळसा हब मध्ये रुपांतर करण्यास आम्ही पुर्ण विरोध करु असे सांगुन, काॅंग्रेस पक्षाचे गोव्यात चालु असलेल्या कोळसा विरोधी तसेच पर्यावरण जनत करण्याच्या आंदोलनांस पुर्ण समर्थन असल्याचे  चोडणकर यांनी स्पष्ट केले.
आज राज्य व केंद्रातील भाजप सरकार आपल्या क्रोनी क्लबातील मित्रांच्या फायद्यासाठी पर्यावरणाचा नाश करुन तसेच जनतेच्या आरोग्याकडे खेळ करुन रेल्वे दुपदरीकरण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे . हजारो झाडांची कत्तल करुन निसर्गाला हानी होणार आहे. लोकांच्या आरोग्याचे प्रश्न उभे राहणार आहेत असा इशारा  चोडणकर यांनी दिला.
मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत व त्यांचे सर्व मंत्री तसेच भाजपचे पदाधिकारी यांचे व्यक्तिगत हितसबंध गुंतलेले असल्याने, ते केवळ आपल्या स्वार्थासाठी लोकांना मृत्युच्या खाईत ढकलत आहे असा दावा, चोडणकर यांनी केला.
सरकार आज रेल्वे दुपदरीकरण, सागरमाला प्रकल्प तसेच महामार्गांवर कोळसा वाहतुकीसाठी खास ट्रॅक केल्यानंतर त्याचा गोव्यातील जनतेच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर गंभीर परिणाम होणार आहेत हे उघड होणार असल्यानेच सदर प्रकल्पांसाठी वैज्ञानीक पद्धतीने अभ्यास करण्याचे टाळत आहे असा, दावा गिरीश चोडणकर यांनी केला.
मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत व वाहतुक मंत्री माविन गुदिन्हो यांनी रेल्वे कायदा अमलात आणुन गोव्यात रेल्वे दुपदरीकरण काम सुरू करावे असा सल्ला रेल्वे अधिकाऱ्यांना देणे हे धक्कादायक आहे. आम्ही त्याचा निषेध करतो असे सांगुन, कायदे हे जनतेच्या भल्यासाठी असतात व लोकभावंनांच्या आड येत असलेले कायदे बदलणे सरकारला आम्ही भाग पाडु असा इशारा  चोडणकर यांनी दिला.