मोग’मध्ये अफोर्डेबल आर्ट फेस्टिवलचे आयोजन

0
895

 

गोवा: म्युझियम ऑफ गोवा तर्फे 17 डिसेंबर ते 28 फेब्रूवारी दरम्यान पहिल्या गोवा अफोर्डेबल आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.मोगचे संचालक डॉ. सुबोध केरकर आणि सिद्धार्थ केरकर यांनी आज कला अकादमीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. मोगच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर या आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.देश विदेशातील नामांकित आणि नव चित्रकार आपली कला या महोत्सवात मांडणार आहेत.प्रख्यात लेखक अमिताव घोष यांच्या हस्ते या महोत्सवाचे 17 डिसेंबर रोजी उद्धाटन केले जाणार आहे.या महोत्सवात सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा किंमतीची चित्रे मांडली जाणार आहेत.साधारण 3 हजार ते 1 लाखांपर्यन्त त्यांची किंमत असणार आहे.गोव्यातील नामवंत आणि नवोदित कलाकारांना या महोत्सवातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.जर्मनी येथील प्रसिद्ध क्यूरेटर पीटर मुलेर यांच्या नेतृत्वाखाली महोत्सवातील कलाकृतीची निवड केली जाणार आहे.गोवा हे पर्यटन राज्य असून देखील सरकार स्थानिक कलाकारांच्या कलांना व्यासपीठ उपलब्ध करून देत नसल्या बद्दल केरकर यांनी नाराजी व्यक्त केली.