मॉनस्टर्स’ चित्रपट समाज ज्या गोष्टी राक्षसी मानतो त्यावर भाष्य करतो-दिग्दर्शक मारेस ओल्तानू

0
702

 

 

गोवा खबर:समलिंगी संबंध, मूल होऊ नये असे वाटणाऱ्या महिला यासारखे अनेक विषयक समाजाच्या दृष्टीने राक्षसी किंवा अघोरी आहेत आणि तेच विषय मला उलगडून पहायचे होते असे मत दिग्दर्शक मारेस ओल्तानू यांनी आज भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

 

आपल्या ‘मॉनस्टर्स’ चित्रपटाविषयी बोलताना ओल्तानू म्हणाले की तो नातेसंबंध, सहनशीलताबाबत आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना अनुरूप नसतात तेव्हा कालांतराने त्यांच्या नात्यात काय घडते हे मला उलगडायचे होते.

हा चित्रपट ध्वनीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचवता येईल याबाबत सिनेमॅटोग्राफर लुधियान सिओबानू यांच्याशी चर्चा केल्याचे ते म्हणाले. पूर्ण फॉरमॅटमध्ये चित्रपट चित्रीत करण्यात आला मात्र फ्रेमिंग एडिटिंगदरम्यान करण्यात आल्याचे सियोबानू म्हणाले.

या चित्रपटाची तयारी करताना अनेक विवाहित जोडण्यांशी बोललो आणि त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली असे ओल्तानू म्हणाले.