मॉडेल पूनम पांडेची गोव्यात पती विरोधात विनयभंगाची तक्रार;पतीला अटक

0
294
गोवा खबर:आपल्या हॉट अंदाजा बद्दल प्रसिद्ध असलेल्या मॉडेल पूनम पांडे हीने आपल्या पती विरोधात दक्षिण गोव्यातील काणकोण पोलिस स्थानकात विनयभंग आणि मारपीटीची तक्रार नोंदवल्या नंतर पोलिसांनी पूनमचा पती सॅम बॉम्बे याला अटक केली आहे.
पूनम आपल्या एका चित्रीकरणासाठी दक्षिण गोव्यातील काणकोण येथे आली आहे.तिच्या सोबत तिचा पती सॅम बॉम्बे देखील आहे.
पूनमने आज काणकोण पोलिस स्थानकात तक्रार नोंदवताना पती सॅमने आपला विनयभंग केला असून आपणास मारपीट केल्याचा उल्लेख केला आहे.तक्रार दाखल झाल्या नंतर काणकोण पोलिसांनी पूनमची वैद्यकीय चाचणी करून पती सॅमला अटक केली आहे.
पूनम आणि सॅमचे याच महिन्यात लग्न झाले आहे.कोविडमुळे त्यांनी लग्न साधेपणाने केले होते.इंस्टाग्रामवर तिने 4 दिवसांपूर्वी  हॅविंग द बेस्ट हनीमून म्हणत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.