‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विमान उत्पादन आणि हवाई वाहतूक क्षेत्रातल्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य : सुरेश प्रभू

0
1182

​​

गोवा खबर :  ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत विमाने आणि हवाई वाहतूक क्षेत्राशी संबंधित उपकरणांची निर्मिती, हवाई वाहतूक क्षेत्रासाठीची सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य असून, त्याचबरोबरीने भारतात जागतिक तोडीच्या माल आणि प्रवासी हब निर्मितीलाही आपले प्राधान्य असल्याचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. विमान वाहतूक उद्योगाशी संबंधितांच्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. विविध विमान वाहतूक कंपन्यांचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, विमानतळ संचालक, तसेच प्रवासी सेवा, सुरक्षितता, पायाभूत सुविधा, इत्यादी सेवांशी संबंधित अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.

हवाई वाहतूक उद्योग क्षेत्रातली वाढ, जागतिक तोडीची राहील, याची खातरजमा करण्यासाठी ठराविक कालावधीनंतर अशा बैठका आयोजित केल्या जातील अशी माहिती प्रभू यांनी दिली.