मॅक्स फॅशनचे गोव्यात चौथे स्टोअर

0
820
गोवा खबर:भारतातील सर्वांत मोठा व एकमेव फॅमिली फॅशन ब्रँड असलेल्या मॅक्स फॅशनने आज गोव्यातील आपल्या चौथ्या दालनाचे उद्घाटन केले. १३ हजार चौरस फूट क्षेत्रफळात विस्तारलेल्या या दालनामध्ये ग्राहकांना आंतरराष्ट्रीय शॉपिंगचा अनुभव मिळणार आहे. पुरुष, महिला, मुले अशा कुटुंबातील सर्वंच वयोगटातील घटकांसाठी या स्टोअरमध्ये एकचा छताखाली नवनवे फॅशनचे ट्रेंड, कपडे आणि असेसरी उपलब्ध आहेत.
या स्टोअरच्या उद्घाटनप्रसंगी मॅक्स फॅशनच्या कर्नाटक व गोवा विभागासाठीच्या रिटेल ऑपरेशनचे एवीपी श्री. पीयूष शर्मा म्हणाले, “गोव्यात चौथे स्टोअर सुरू करताना मोठा आनंद होत आहे. आजवर आम्हाला गोव्यातून नेहमीच चांगला प्रतिसाद लाभला आहे. ग्राहकांनी दाखवलेले प्रेम आणि आपलेपणा यामुळे राज्यातील आमचे जाळे विस्तारण्यास प्रेरणा मिळाली. यापुढेही ग्राहकांना आम्ही सादर केलेली वस्त्रप्रावरणे, फॅशन ट्रेंड आवडतील अशी खात्री आहे. नेहमी असेच प्रेम आणि पाठबळ मिळत राहो हीच अपेक्षा.”
या निमित्ताने मॅक्स फॅशनने एक शुभारंभी योजना सादर केली आहे. ३९९९ रूपये वा अधिकच्या खरेदीवर ग्राहकांना १०९९ रुपये किमतीचा सेलो रॉयल सर्विंग बाऊल सेट केवळ ९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
या सीझनचे काही ट्रेंड्स खालीलप्रमाणे –
आता लवकरच वसंत ऋतूस सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आपला हा सीझनही आनंदात व संस्मरणीय असा जावा या हेतूने मॅक्स फॅशनने कूल आणि फ्रेश डिझाईनचे स्प्रिंग कलेक्शन सादर केले आहे.
मेन्सवेअर व्हिन्टेज कलेक्शन : या कलेक्शनमध्ये शाश्वतता, निसर्ग आणि आउटडोअर असा संगम साधला गेला आहे. अतीशय सुटसुटीत असलेल्या या कलेक्शनमध्ये अतीशय हलक्या धाग्याने व्हिंटेज सिलहुट्टीला आधुनिक साज चढवला देला आहे. सुलभपणे वॉश करता येतील अशा जीन्स पॅंट आहे. ऑर्गेनिक कॉटन आणि लिननचा वापर करून शर्ट, टीशर्ट आणि चिनोज विकसित करण्यात आले आहेत. विविध वनस्पतींपासून प्रेरित डिझाईन तसेच ट्रॉपिकल प्रिंटनी सहज, फ्रेश अशा ग्राफिकनी मेन्स कलेक्शन सजले आहे.
इंडियन वेअर बेला मिया कलेक्शन : फुले-पाकळ्यांची वैविध्यपूर्ण रंगसंगती आणि आकार आणि ठळक प्रिंटमधून साकारले गेलेले, आनंद मिरवणारे हे कलेक्शन आहे. तजेलदार फुलांच्या रंगसंगतीमुळे महिलावर्गासाठी पिकनिक, रिसॉर्टमध्ये परिधान करण्यासाठी योग्य ट्रेंड असलेले हे कलेक्शन आहे. रंग आणि ठशांमधील ठळकपणा स्त्रीशक्तीचे प्रतिबिंब दर्शवतो. स्वप्न पाहण्याचे धाडस करणाऱ्या महिलावर्गाचे प्रतिनिधित्व हे कलेक्शन करते.
किड्सवेअर कलेक्शन : युनिकॉर्न आणि समुद्र या संकल्पनेवर बालवर्गासाठी आउटफिट्स आणि आनंददायी, मजेशीर प्रिंटमधील छोट्या बाळांसाठींची श्रेणी आपल्या घरातील लहानग्यांना नटण्यासाठी भारीच आहे. बाहुल्यांच्या संकल्पनेवर आधारित आकर्षक स्कर्ट, टॉप, ग्राफिक टी, डेनिम, फ्रॉक असे वैविध्यपूर्ण कलेक्शन या हंगामासाठी सादर करण्यात आले आहे.