मॅक्स फॅशनच्या स्टायलिश गणेशमूर्ती स्पर्धेत प्रिया गडेकर प्रथम

0
997

 

 

गोवा खबर:भारतातील आघाडीचा फॅशन ब्रँड असलेल्या मॅक्स फॅशनने मॉल डि गोवा मध्ये मॅक्स गोवाज स्टायलिश गणेश आयडॉल २०१९ या स्पर्धेचे ८ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजन केले आहे. या स्पर्धेस भरघोस प्रतिसाद लाभला असून १०००हून अधिक स्पर्धकांची नोंदणी झाली असून आकर्षक गणेशमूर्तींची नावीन्यपूर्ण छायाचित्रे प्राप्त झाली आहेत.

मॅक्स गोवाज स्टायलिश गणेश आयडॉल स्पर्धेमध्ये गणेशमूर्तीला आकर्षकपणे सजवण्याची सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले जात आहे. इच्छुकांना दोन टप्प्यांच्या प्रवेश प्रक्रियेद्वारे या स्पर्धेमध्ये सहभागी होता येते. पहिला टप्पा म्हणजे नावनोंदणी करणे आणि दुसरा टप्पा म्हणजे वॉट्स अॅपच्या माध्यमातून छायाचित्रे पाठविणे.

 

ध्यासमग्न, सकारात्मक विचाराच्या आणि उत्साही अशा अनेक कुटुंबांद्वारे या स्पर्धेत सहभागाची चढाओढ दिसून आली. नोंदणी केलेल्या ग्राहकांमधून निवडक स्पर्धकांना प्रसिद्ध अभिनेता आणि मॅक्स गोवाज स्टायलिश गणेश आयडॉल २०१९ स्पर्धेचे परीक्षक स्वप्नील जोशी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये स्पर्धेत प्रिया गडेकर हिने प्रथम,सिद्धि नाईक हिने द्वितीय तर उद्देश सोनाईक याने तृतीय क्रमांक पटकावला . त्यांनी मॅक्स फॅशनकडून ५००० रुपये किमतीचे गिफ्ट हॅम्पर जिंकले.

 

याबाबत मॅक्स फॅशनचे सहयोगी उपाध्यक्ष पियूष शर्मा म्हणाले, “प्रथमच आम्ही अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन केल्याने अधिकाधिक ग्राहकांना नावीन्यपूर्ण, मनोरंजनात्मक पद्धतीने यामध्ये सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न राहिला. गोवाज स्टायलिश गणेश आयडॉल स्पर्धेतून अधिकाधिक कुटुंबांशी नाते जोडण्याचा आमचा उद्देश आहे. पहिल्या वर्षी या स्पर्धेस तुफान प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने आमच्या ग्राहकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. गोव्यामध्ये अशीच चांगली कामगिरी करत राहण्याचा आमचा ध्यास असून ग्राहकांना आनंददायी शॉपिंगा आनंद देण्यासाठी सेवेचा उच्च दर्जा राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमची फॅशन, कपडे परिधान करणे अधिकाधिक ग्राहकांची पहिली पसंत बनत आहे. ग्राहकांचे असेच प्रेम, विश्वास आणि पाठबळ मिळत राहो हीच अपेक्षा.”

 

अंतिम फेरीतील निवडीबाबत सेलिब्रिटी परीक्षक स्वप्नील जोशी म्हणाले, “या स्पर्धेची संकल्पना, कल्पकपणे केलेले आयोजन प्रशंसेस पात्र आहे. असे सकारात्मक उपक्रम राबवत सणासुदीचा उत्साह द्विगुणित करत गोव्यातील कलागुणांना प्रोत्साहन देत, अशा कलाकारांचा विश्वास वाढवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध केल्याबद्दल मला मॅक्स फॅशनचे आभार मानावेसे वाटतात. तसेच गोव्यातील सर्जनशीलतेचे अनोखे नमुने अनुभवण्याची संधी दिल्याबद्दलही मी मॅक्स फॅशनचा ऋणी आहे. अनेक चांगले सुखद क्षण व अनुभव घेत मी जात आहे.”