गोवा:भारतातील एका शहरातून निवड झाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर आपल्या शहराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मोठी व महत्त्वाची ठरत असते. पण त्याही पेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेसाठी आपले कौशल्य विकास करण्यासाठी प्रशिक्षणही मिळत आहे. हेच मॅक्स इलाईट मॉडेल लुक इंडिया स्पर्धेतून घडत आहे आणि आता भारतातील अंतिम फेरीतील स्पर्धकांसाठी बुट कॅम्पचे आयोजन गोव्यात करण्यात आले आहे.
भारताच्या विविध भागांतून सहभागी स्पर्धकांमधून आता अंतिम फेरीसाठी १६ स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.विशेष म्हणजे यात गोव्यातील दोन स्पर्धकांचा समावेश आहे. अंतिम फेरीतील हे १६ स्पर्धक गोव्यामध्ये बुट कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत. व्यक्तिमत्व खुलवण्याबरोबरच वक्तृत्व, देहबोली यांच्यामध्येही सुधारणा करण्याचे प्रशिक्षण या बुट कॅम्पच्या माध्यमातून दिले जाणार आहे. या स्पर्धकांना सर्वोत्तम प्रशिक्षण देण्यासाठी फॅशन व सौंदर्य क्षेत्रातील नामवंतांची निुयुक्ती करण्यात आली आहे.  या क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आले आहेत. आज, या स्पर्धेतील एक विशेष भाग म्हणून, या १६ स्पर्धकांनी मॉल दी गोवामधील मॅक्स स्टोअरला भेट देत आपली सेल्फ-स्टायलिंगची क्षमता तपासण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्ध फॅशन मॅग्नेट मार्क रॉबिन्सन हे ग्लॅम टीमचे नेतृत्व करत असून सुपरमॉडेल कॅरोल ग्रासियश यांच्या हाताखाली या स्पर्धकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण प्रक्रियेवर ते बारकाईने नजर ठेवून आहेत. सेलिब्रिटी हेअर अँड मेक-अप् आर्टिस्ट क्लिन्ट फर्नांडिस स्पर्धकांना व्यक्तिमत्त्व खुलवण्याविषयक मार्गदर्शन करत आहेत.
आठवडाभर सुरु असलेल्या या प्रशिक्षण शिबिरात मेकओव्हर, फोटो शूट, फिटिंग्ज, अंतिम स्पर्धेचा सराव आदी प्रशिक्षण उपक्रमातून या स्पर्धकांना मॉडेलिंगच्या दुनियेत कसा यशस्वी प्रवेश करावा याविषयी मार्गदर्शन केले जात आहे.
या खडतर तयारीच्या माध्यमातून २९ सप्टेंबर रोजी गोव्यात होणाऱ्या भारतीय अंतिम फेरीसाठी या स्पर्धक सज्ज होत  आहेत. या भारतीय फेरीच्या अंतिम स्पर्धेतील विजेते आगामी नोव्हेंबर महिन्यात मिलान मध्ये आयोजित इलाईट मॉडेल लुक वर्ल्डच्या अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या जागतिक फेरीसाठी ३०हून अधिक देशांतील राष्ट्रीय विजेते सहभागी होणार आहेत.