मॅक्स आणि जीटीडीसीद्वारे आयोजित पहिल्या अखिल गोवा स्टार अँड क्रिब बनवा स्पर्धेची सांगता

0
1079

 

 

गोवा खबर:भारतातील आघाडीचा फॅशन ब्रँड असलेल्या मॅक्स फॅशनद्वारे आयोजित पहिली अखिल गोवा क्रिब अँड स्टार बनवा स्पर्धा २७ डिसेंबर २०१९ रोजी मॉल डि गोवा मध्ये पार पडली. या स्पर्धेस १५००हून अधिक स्पर्धकांनी नावनोंदणी केली होती. स्पर्धेसाठी अनेक नावीन्यपूर्ण अशी स्टार व क्रिबची छायाचित्रे प्राप्त झाली.

अखिल गोवा स्टार अँड क्रिब स्पर्धेमध्ये आपल्या कलेतील सर्जनशीलता, नावीन्यता, कला गुणांचे दर्शन घडवण्याची संधी उपलब्ध झाली. सुलभ अशा द्विस्तरीय प्रक्रियेच्या माध्यमातून इच्छुकांना या स्पर्धेत सहभागी होता आले. नोंदणीचा पहिला टप्पा म्हणजे ऑनलाइन नोंदणी करणे आणि दुसरा टप्पा म्हणजे दिलेल्या मोबाईल क्रमांकावर वॉट्स अॅपच्या माध्यमातून छायाचित्रे पाठवणे असा होता.

स्पर्धेत अनेक हरहुन्नरी, उत्साही स्पर्धकांनी आपल्या कुटुंबियांसह सहभाग घेतला. नोंदणीकृत स्पर्धकांमधून निवडक स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी मॉल डि गोवामध्ये आमंत्रित करण्यात आले. त्यांच्या कलाकृतींचे परीक्षण गोवा पर्यटन आणि मॅक्सच्या परीक्षण पथकाद्वारे करण्यात आले.

मॅक्स फॅशनचे सह-उपाध्यक्ष श्री. पियुष शर्मा म्हणाले, “या पहिल्यावहिल्या अखिल गोवा स्टार मेकिंग आणि क्रिब मेकिंग स्पर्धेत सहभागी झालेल्यांचे मी सर्वप्रथम आभार मानू इच्छितो. नाताळ सण साजरा करण्यासाठी भारतामध्ये गोवा हे एक लोकप्रिय स्थळ म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या सणाचे औचित्य साधत काहीतरी वेगळा उपक्रम राबवण्यासाठी गोवा उत्तम ठिकाण ठरले. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत १५००हून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली. गोमंतकीयांशी एक आपुलकीचे नाते निर्माण करण्यासाठी एक ब्रँड म्हणून आम्ही विविध प्रयत्न करत आहोत आणि आमच्या उत्पादन-सेवांचा दर्जा राखत ग्राहकांना आनंदी शॉपिंगचा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. आमची उत्पादने परिधान करणे ग्राहकांना आवडते असे आम्हाला वाटते. आपले प्रेम, सहकार्य यापुढेही असेच कायम राहू दे अशीच अपेक्षा.”

अंतिम फेरीबाबत गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) चेअरमन श्री. दयानंद सोपटे म्हणाले, “गोव्यात प्रथमच आयोजित या ख्रिसमस क्रिब स्पर्धेस मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी मी सर्व स्पर्धकांचा आभारी आहे. नाताळ सणाचा आनंद गोव्यात मोठाच असतो, पण या स्पर्धेमुळे या आनंदाची उंची आणि व्याप्ती आणखी वाढली. भरभरून दिलेल्या या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार. नाताळ क्रिबच्या उभारणीत व रचनेमध्ये आपले सर्वोत्तम योगदान दिलेल्या स्पर्धकांचे तसेच सर्व विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन. सर्वांचे आभार.”