गोवा खबर:गेले दोन दिवस सुरु असलेल्या पावसाने आज कहर केल्यामुळे गोव्यात बहुतेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे.दुपार नंतर मुसळधार पावसामुळे दाबोळी विमानतळावर उतरणारी 16 विमाने अन्यत्र वळवावी लागल्यामुळे शेकडो प्रवासी विमानतळावर अड़कून पडले आहेत.
हवामान खात्याने आज गोव्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.आज आणि उद्या मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.गोव्यात काही भागात अती ते अती मूसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.आज सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरु आहे.अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले आहे.सखल भागातील वस्ती मध्ये घरात पाणी घुसुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.काही ठिकाणी दरड कोसळ्याने वाहतूक खंडित झाली होती.राजधानी पणजी मधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.समुद्र खवळलेला असल्याने पर्यटकांनी समुद्रात उतरु नये असा इशारा दृष्टि लाइफ गार्ड संस्थेने दिलेला आहे.पावसामुळे नदया,नाले दुथडी भरून वाहत आहेत.