मुलांना निसर्गाची माहिती करून द्या:मुख्यमंत्री

0
1290

 गोवा:मुलांना घडवण्यात पालक कमी पडत असल्याचे सांगत मुलांना घरा बाहेरचे विश्व,निसर्ग अनुभवायला द्या असा सल्ला मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी  पणजी येथील चर्च चौकात लहान मुलांसाठी आयोजित रस्ता रंगवा स्पर्धेवेळी बोलताना दिला.
पणजी येथील चर्च चौकात चर्च समोरिल रस्त्यावर रसत्यावरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेच्या उद्धाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पर्धेत सहभागी मुलांबरोबर संवाद तर साधलाच शिवाय मुलांना घडवण्यात कमी पडत असल्याबद्दल पालकांना कानपिचक्या दिल्या.पर्रिकर यांनी मुलांना बोंडला अभयारण्य,बुडबुड्याचे तळे,सावईवेरेचा धबधबा,कासव संरक्षण केंद्रांसारखी ठिकाणे बघितली का असा प्रश्न केला असता बहुतेकांच्या चेहऱ्यावर हे काय विचारत आहेत असे भाव मुलांच्या चेहऱ्यावर दिसून आले.त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणांची माहिती उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालकांना आपल्या मुलांना घेऊन पणजीत 10 ठिकाणी सुरु असलेल्या सेरेंडीपीटी फेस्टिव्हल मध्ये जाऊन तेथील विविध कला प्रकार दाखवण्यास सांगितले.आशिया मधील एक सर्वोत्तम फेस्टिव्हल पणजीत सुरु असून वेळात वेळ काढून तो मुलांना दाखवा असे मुख्यमंत्री म्हणले.
मुख्यमंत्री बनले स्ट्रीट पेंटर
मुलां सोबत संवाद साधल्या नंतर मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर प्रथम निळ्या स्प्रेने दिलचा आकार काढला. लोकांनी त्याला हार्ट म्हणताच मुख्यमंत्र्यांनी ते हार्ट नाही तर ऍपल असल्याचे सांगितले.नंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी आपण गाजराचे चित्र काढत असल्याचे पहिल्यांदा सांगत लोकांना अंदाज व्यक्त करण्याची संधी दिली नाही.