मुरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर यांचा भाजप प्रवेश

0
631
पणजी:मुरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनी आज आपल्या दिडशे समर्थकांसोबत भाजप मध्ये प्रवेश केला.
पणजी येथील भाजप मुख्यालयात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचे भाजप मध्ये स्वागत केले.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शेखर खडपकर यांनी आपल्या समर्थकांसोबत भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे.दक्षिण गोव्याच्या लोकसभा निवडणूकीत भाजप त्यांचा फायदा होईल,असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष क्रीतेश गावकर यांनी आपल्या तिनशे समर्थकां सोबत भाजप मध्ये प्रवेश केला होता.कालच शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी पंचायत मंत्री माविन गुदींन्हो आणि पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.
काही कारणामुळे भाजप पासून दूर गेलो होतो.आता भाजप मध्ये घरवापसी केली आहे.उद्या दाबोळी येथे मोठी सभा आयोजित करून दक्षिण गोव्यातून भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांना विजयी करण्यात हातभार लावणार असल्याचे खडपकर यांनी यावेळी सांगितले.
शेखर खडपकर आणि त्यांचे समर्थक दक्षिण गोव्यात भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपली ताकद पणाला लावणार आहेत.उद्या दाबोळी मतदारसंघात 5 हजार लोकांची सभा घेऊन नरेंद्र सावईकर यांना मुरगाव तालुक्यातील चार मतदार संघामधून गेल्या वेळ पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिले जाईल,असा विश्वास पंचायत मंत्री माविन गुदींन्हो यांनी यावेळी व्यक्त केला.