मुरगावचे नगराध्यक्ष क्रीतेश गावकर भाजपात दाखल

0
706
गोवा खबर: मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष क्रीतेश गावकर यांनी आपल्या 300 समर्थकांसह भाजपमध्ये  प्रवेश केला.भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

पणजी येथील भाजप मुख्यालयात पार पडलेल्या छोटेखानी सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर आणि नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या प्रमुख उवस्थितीत प्रवेश कार्यक्रम पार पडला.
 भाजप प्रवेशा नंतर पत्रकारांशी बोलताना गावकर म्हणाले, वास्को शहराच्या विकासासाठी भाजप सरकारने   मला वेळो वेळी भरघोस निधी उपलब्ध करून दिला.केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत.त्यामुळे समर्थकांनी देखील आपण भाजप सोबत जाऊया अशी मागणी केली होती.सर्वांच्या विनंतीचा मान राखून आज मी 300 समर्थकांसह भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
गावकर यांनी मागील विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर लढवली होती.त्यांना दीड हजार मते मिळाली होती.त्यांच्या भाजप प्रवेशा मुळे दक्षिण गोव्यात भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.
नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांनी देखील गावकर पक्षात आल्याने आनंद व्यक्त केला.नाईक म्हणाले, गावकर हे चांगले कार्यकर्ते असून त्यांच्या कडून यापुढे देखील चांगले काम होईल अशी आशा बाळगतो.