मुद्रा’ योजनेअंतर्गत राज्यात 81.69 कोटी रुपयांचे कर्जवाटप-श्रीपाद नाईक

0
992

पणजी:‘प्रधानमंत्री मुद्रा’ योजनेअंतर्गत देशभरात 9.13 कोटी लाभधारक आहेत. तर, राज्यात 7,319 लाभधारकांना 81.69 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी दिली. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री ‘मुद्रा योजने’च्या विशेष शिबिराचे पणजीमध्ये उदघाटन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठार राज्याचे अर्थसचिव दौलत हवालदार आणि बँकींग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

जनतेने ‘मुद्रा’ योजनेप्रमाणेच केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी श्रीपाद नाईक यांनी केले. लघु आणि सुक्ष्म उद्योजकांचे सबलीकरण करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, हा मुद्रा योजनेचा मुख्य उद्देश आहे. ज्यांच्याकडे क्षमता आहे पण आर्थिक कुवत नाही, त्यांना या योजनेच्या माध्यमातून अर्थपुरवठा केला जातो. मुद्रा योजनेप्रमाणेच स्टार्ट-अप इंडिया, स्टँड अप इंडिया, या योजनांचाही लाभ घ्यावा, असे श्रीपाद नाईक म्हणाले. मुद्रा योजनेअंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण अशी विभागणी करण्यात आली असून अनुक्रमे रु.50,000, रु. 5 लाख आणि रु. 5 ते 10 लाख असे कर्जवाटप केले जाते. केंद्रीय अर्थमंत्रालयाने देशभर अशाप्रकारच्या 50 शिबिरांचे आयोजन केले आहे.