मुख्यमंत्र्याहस्ते साखळीत जीमचे उद्घाटन

0
1014

गोवा खबर: साखळी गृहनिर्माण वसाहत संघटणेतर्फे खास मुलासाठी सुरु केलेल्या जीमखान्याचे उद्घाटन मुख्यमंत्री ड़ाँ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी साखळी नगरपालिकेच्या नगरसेविका सौ शुभदा सावईकर, गोवा साधन सुविधा महामंडळाचे संचालक श्री दत्तराम चिमुलकर, संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष भगत, उपाध्यक्ष श्री दामोदर सातोडकर, सचिवा सौ सिध्दी प्रभू व खजिनदार श्री महादेव देसाई उपस्थित होते.

 यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत यानी आरोग्यासाठी व्यायाम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. मुलानी आपल्या दैनंदिन कामाबरोबर व्यायामासाठी वेळ राखून ठेवणे गरजेचे असल्याचे त्यानी सांगितले.

 सरकार सर्वतऱ्हेच्या सुविधा जनतेच्या दारापर्यंत पहोचविण्यासाठी कटिबध्द असून साखळीतील जनतेच्या सोयीसाठी लवकरच मोठ्या क्षमतेच्या सभागृहाचे  उद्घाटन होणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. सर्वानी आपआपसातील भेदभाव दूर सारून गोव्याच्या उज्वल भवितव्यासाठी झटण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

साखळीच्या नगरसेविका शुभदा सावईकर यानी साखळीच्या सर्वांगिण विकासासाठी सांखळी नगरपालिका कटिबध्द असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन व सहकार्य साखळीला विकासाकडे घेऊन जात असल्याचे सांगितले.

 सुरवातीला संतोष भगत यानी प्रस्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले व शेवटी आभार मानल