मुख्यमंत्र्याकडून विविध खात्यांच्या खर्चाचा आढावा

0
809

गोवा खबर: मुख्यनंत्री डॉ प्रमोद सावंत यानी विविध खात्यांचा ३० सप्टेंबरपर्यंत केलेल्या खर्चाचा आढावा घेतला. खर्चाची एकूण आकडेवारी ३२ टक्के, महसूल खर्च ३८ टक्के, भांडवल खर्च २० टक्के आणि सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत ६६१२ कोटी रूपये खर्च केल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली. गेल्या वर्षी याच कालावधित ३२ टक्के खर्च झाला होता

      मुख्यमंत्र्यानी प्रमुख ४८ खात्यांचा आढावा घेतला आणि त्यांचा एकंदरीत खर्च ८६ टक्के आहे. तसेच त्यानी खर्चाच्या वापराबाबत वेळोवेळी माहिती सादर करण्याची सूचना अधिकाऱ्याना केली त्यामुळे डिसेंबरपर्यंत किमान ७० टक्के खर्च करता येईल.

      केंद्र करकारतर्फे देण्यात येणाऱ्या निधीचा वापर चांगल्या प्रकारे करून त्याचा अहवाल वळोवेळी सादर करण्याचा आणि खात्याची यंत्रणा कार्यरत करण्याचे आदेश त्यानी खाते प्रमुखाना दिले.