मुख्यमंत्र्याकडून पत्रकारिता दिनाच्या शुभेच्छा

0
534

 

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी प्रसार माध्यमाना राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

१९६६ साली भारतीय वृत्त्तपत्र मंडळाची स्थापना करण्यात आली. त्या दिवसाची आठवण म्हणून राष्ट्रीय पत्रकारिता दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय पत्रकारिता दिन म्हणजे भारतातील मुक्त व जबाबदार पत्रकारितेचे प्रतिक आहे. भारतीय वृत्त्तपत्र मंडळ ही प्रसार माध्यमावर  नैतिकदृष्ट्या लक्ष ठेवणारी संस्था आहे.

लोकशाही समाजाच्या विकासात मुक्त व स्वतंत्र पत्रकारितेच्या भुमिकेविषयी जनजागृती निर्माण करणाऱ्या प्रसार माध्यमांच्या भुमिकेचे मुख्यमंत्र्यानी प्रतिपादन केले. सर्व प्रसार माध्यमाद्वारे विशेषता पत्रकार  व छाया पत्रकार यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या मेहनतीची मुख्यमंत्र्यानी प्रशंसा केली आहे. सरकारचा दृष्टीकोन त्यानी जनतेसमोर मांडावा असे आवाहन त्यानी केले आहे..

कोविड-१९ जागतिक महामारीच्या काळात  प्रसार माध्यमानी योग्य माहिती लोकांपर्यंत पोचविण्यात तसेच कोविड- १९ वर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात, सरकारी यंत्रणा मजबूत करण्यात महत्वाची भुमिका बजाविली आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात.