मुख्यमंत्र्याकडून गोव्यातील लोकांना होळीच्या शुभेच्छा

0
316

गोवा खबर:गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना होळीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.       आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘’ होळी सण हा भारतातील सर्वाधिक पुज्य मानला जाणारा रंगांचा सण असून तो एकता, सामाजिक सलोखा दृढ करतो आणि समाजामध्ये आनंदाचा प्रसार करतो.

हा सण आपण सर्वाना आनंद आणि भरभराट घेऊन येवो असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

  राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना होळीच्या शुभेच्छा

 राज्यपाल  सत्यपाल मलिक यांनी लोकांना होळीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, ‘’ होळी सण हा भारतातील सर्वाधिक पुज्य मानला जाणारा सण आहे आणि तो आपल्या देशातील जवळजवळ सर्व भागांमध्ये साजरा केला जातो. प्रेमाचा सण म्हणूनही तो ओळखला जातो. यादिवशी लोक एकमेकांमधील मतभेद विसरतात आणि एकत्र येतात. होलिका दहन किंवा छोटी होली म्हणूनही ती सणाच्या अगोदर साजरी केली जाते आणि येणारा दिवस म्हणजे होळी, रंगांचा दिवस. रंगांची उधळण जी आपल्या जीवनात सकारात्मकता आणते. होळी हा रंगाचा उत्सव, तो मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. होळी हा प्रमुख आणि आवडता सण असून तो जात, पात, धर्म बाजुला सारून मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. होळीच्या आदल्या दिवशी शेकोटी पेटवून सणाला सुरवात होते. वाईट विचारांवर सत्याचा विजयाचे प्रतिक हा सण आहे. हिंदूंच्या दिनदर्शिकेनुसार हा शेवटचा सण असून प्रत्येक व्यक्तीनी सर्व वाईट दुर्गुण, व्देष, मत्सर सोडून द्यावा आणि येणारे वर्ष नवीन आशा आणि उत्साहाने सुरू करावे हा या सणाचा संदेश आहे. बंधुता, परस्पर समन्वय, सामाजिक एकता आणि राष्ट्रीय एकात्मकतेला प्रेत्साहन देणारा हा सण आहे असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

होळीनिमित्त राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

देशातल्या तसेच परदेशात वास्तव्य करणाऱ्या सर्व भारतीयांना होळीच्या सणानिमित्त मी शुभेच्छा देत आहे. रंगांच्या या महोत्सवामुळे हिवाळा संपून वसंत ऋतुचे आगमन झाल्याचे सूचित होते. आपल्या सांस्कृतिक कालगणनेत या सणाला आशेचा दूत म्हणून महत्वाचे स्थान आहे. सर्व पिढ्यांमध्ये दिसून येणारा उत्साह हे देशभरात साजरा होणाऱ्या या सणाचे वैशिष्ट्य आहे. अनंत प्रकारच्या रंगांनी नटलेल्या या सणामधून आपली विविधता आणि बहुसांस्कृतिक परंपरा उत्तम रितीने प्रतिबिंबित होते. या सणामुळे आपल्या हृदयात जतन केलेल्या राष्ट्रीय मूल्यांवरचा आपला विश्वास बळकट होवो आणि यातून सर्वांचे हित वाढीस लागो.”