मुख्यमंत्र्यांहस्ते सावईवेरे येथे सरकारी प्राथमिक शाळेची पायाभरणी

0
646

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यानी कला व संस्कृतीमंत्री श्री गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत सावईवेरे येथे सरकारी प्राथमिक शाळेची पायाभरणी केली. जिल्हा पंचायत, पंच सदस्य, पालक, शिक्षक आणि शालेय विध्यार्थी यावेळी उपस्थित होते.

 

      याप्रसंगी बोलताना डॉ प्रमोद सावंत यानी सुर्ला ते सावईवेरे असा पूल उभारण्यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. या पूलामुळे लोकांमध्ये चागले संबंध जुळण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. मूळ शिक्षण घेण्यासाठी सरकारी प्राथमिक शाळा हे उत्कृष्ठ ठिकाण असल्याचे त्यानी सांगितले. पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकार कठोर परिश्रम घेत असल्याचे त्यानी पुढे सांगितले.