मुख्यमंत्र्यांहस्ते सांखळी येथे कचरा व्यवस्थापनावरील जागृती कार्यशाळेचे उद्घाटन

0
554

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी नगरपालिकेने नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने साखळीतील रविंद्र भवनात आयोजित केलेल्या “डाऊन टू अर्थ” विषयावरील कार्यशाळेला उपस्थिती लावली.

 कचरा निर्मितीची जबाबदारी, कचरा वर्गिकरण आणि होम कंपोस्टींग असा या डाऊन टू अर्थ कार्यशाळेचा विषय होता. या कार्यशाळेला डिचोली तालुक्यातील नवनिर्वाचित प्रतिनिधी आणि संबंधित व्यक्ती उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांहस्ते शहर स्वच्छ ठेवण्याचा गीताव्दारे संदेश देणाऱ्या व्हिडियो सीडीचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शहर स्वच्छ आणि हरित ठेवण्याचे आवाहन लोकांना केले. डॉ. सावंत यांनी  कचरा वर्गीकरणावर भर देताना राज्यातील कचरा व्यवस्थापनाचा धोका यावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन लोकांना केले. आपण जर आपल्या कचऱ्याची काळजी घेतली तर इतर लोकही त्याचे आचरण करतील असे ते म्हणाले.

यावेळी नगरपालिका प्रशासनाचे संचालक डॉ. तारीक थॉमस आयएएस, सांखळीचे नगराध्यक्ष श्री धर्मेश सगलानी, मामलेदार तथा सांखळीचे मुख्याधिकारी श्री प्रविणजय पंडित, उपनगराध्यक्षा श्रीमती कुंदा माडकर, नगरसेविका श्रीमती शुभदा सावईकर, राया पार्सेकर, श्रीमती रश्मी देसाई, श्री राजेश सावळ, श्री आनंद काणेकर तसेच विविध पंचायतीचे सरपंच श्रीमती सुषमा सावंत, गोविंद वेळगेकर, प्रदिप नाईक, संजय नाईक, श्रीमती मयुरी गांवस आणि श्री गौरव पोकळे व इतर उपस्थित होते.

डॉ. तारीक थॉमस आणि श्री धर्मेश सगलानी यांची यावेळी भाषणे झाली.

सुरवातीस श्री प्रविणजय पंडित यांनी स्वागत केले आणि आयोजनामागील उध्देश सांगितला. श्री दत्तप्रसाद जोग यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीमती शुभदा सावईकर यांनी आभार मानले.