मुख्यमंत्र्यांहस्ते राज्यात आयुष-६४ चा शुभारंभ

0
113

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज शहरातील पाटो येथे आयोजित कार्यक्रमात असिमटोमेटिक, सौम्य आणि मोडरेट कोविड-१९ रुग्णांसाठी आयुष ६४ चे विनामूल्य वितरणाचा शुभारंभ केला. भारत सरकारच्या आयुष सरकार, केंद्रीय आयुर्वेद विज्ञान परिषद यांनी मातृभूमी सेवा प्रतिष्ठान गोवा यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, आयुष ६४ हे आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय संशोधन परिषदेने (सीसीआरएएस) विकसित केलेले एक पॉली हर्बल फॉर्म्युलेशन आहे आणि ते असिमटोमेटिक, सौम्य आणि मध्यम रुग्णांच्या उपचारात वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त असल्याचे आढळले आहे. आयुष ६४ ला आयएमसीएसने मान्यता दिली आहे आणि कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी प्रभावी आहे आणि त्याचे दुष्परिणाम होत नाहीत.

संरक्षण राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या भाषणात या सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीत आम्ही जगातील इतर विविध देशांना आयुष ६४ औषधे यशस्वीरित्या पुरवली आहेत असे सांगितले.   केंद्र सरकारने यापूर्वीच देशातील इतर राज्यांमध्ये सांगितलेल्या औषधांचे वितरण सुरू केले आहे. भारतात आपण भाग्यवान आहोत की विविध विषाणूजन्य आजारांवर आपल्या वातावरणात अतिशय प्रभावी आयुर्वेदिक औषधे आहेत आणि ते यशस्वी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

मुख्यमंत्र्यानी  विविध सरकारी आरोग्य विभागाना, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या प्रतिनिधींना औषधांच्या साठा सुपूर्द केला.

सी.सी.आर.ए चे संशोधन अधिकारी. डॉ. एच. के. गुप्ता यांचेही यावेळी भाषण झाले.

या कार्यक्रमाला सीसीआरएएस चे उपसंचालक गोवा, दत्ता भट, मतृभूमी सेवा प्रतिष्ठान गोव्याचे सरचिटणीस मिलिंद महाले आणि इतर उपस्थित होते.