मुख्यमंत्र्यांहस्ते राज्य कर भवनाचे उद्घाटन

0
202

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते अल्तिन्हो पणजी येथे विक्रीकर खात्यासाठी अंदाजे १९.४६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या राज्य कर भवनाचे उद्घाटन करण्यात आले.

या इमारतीत कर कार्यालयाच्या वेगवेगळ्या कामांसाठी लागून असलेल्या तीन ब्लॉकची रचना आहे. गोवा राज्य कर भवन कार्यालयातील कर्मचार्‍यांना तसेच भेट देणाऱ्यांसाठी व्हीआरएफ यंत्रणा वातानुकूलित आहेत. बैठका आयोजित करण्यासाठी प्रत्येक मजल्यावर बैठक कक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत.

नवीन कर अनुपालनासाठी खात्याच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रशिक्षण गरजा भागविण्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल आणि प्रोजेक्शन सिस्टमसह १०० जण बसण्याची क्षमता असलेले प्रशिक्षण सभागृही त्यात आहे.

 मुख्यमंत्र्यांनी लोकांना कर भरणा वेळेवर भरण्याचा आणि जबाबदार नागरिक बनण्याचा सल्ला दिला व छापा टाळण्याचे आवाहन केले. संबंधित अधिकाऱ्यांनी कर वसुलीला २८०० रुपयांवरून ४००० कोटी रूपयांपर्यंत कर वाढविण्यासाठी प्रयत्न केले आणि तो एक स्तुत्य कार्यक्रम आहे. जीएसटी कार्यालयातील कर्मचार्‍यांची कमतरता, नवीन कर्मचारी भरती, बढती इत्यादी विषय लवकरच सोडविले जातील असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यानी  पुढे बोलतांना कोविड महामारीच्या काळात राज्याच्या तिजोरीला मार बसला परंतु सरकारने कसेतरी निभाविल्याचे सांगितले. ज्यांनी कर भरलेला नाही त्यांनी वेळेवर रिटर्न भरावा व सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री म्हणाले की नवीन इमारत ही एक अत्याधुनिक इमारत असून पोषक वातावरणाने सुसज्ज असल्याचे सांगितले त्यामुळे कामास गती देण्यासाठी मदत होईल. उत्तम दर्जाची इमारत बांधण्याच्या प्रयत्नांसाठी जीएसआयडीसीचे त्यांनी कौतुक केले व अबकारी खातेही त्या ईमारतीत कार्यरत असेल.

विक्री कर आयुक्त हेमंत कुमार यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की या विभागाचे उद्दीष्ट म्हणजे महसूल संकलन, कर प्रक्रिया सुलभ करणे, प्रभावी सेवा, वेळेवर वितरण, विल्हेवाट सुनिश्चित करणे, मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकतम उपयोग करणे, कर वसुलीसाठी कार्यवाही करणे असा असल्याचे सांगितले.

मुख्य सचिव श्री परिमल राय आय.ए.एस, वित्त खात्याचे प्रधान सचिव पुनीत कुमार गोयल आय.ए.एस, कृषी सचिव चोखाराम गर्ग आय.ए.एस यावेळी उपस्थित होते.