मुख्यमंत्र्यांहस्ते बांदेकर यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन

0
180

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते पणजी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर यांनी लिहीलेल्या ‘’संजयदृष्टी’’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर आणि मयेचे आमदार प्रविण झांट्ये उपस्थित होते.

बांदेकर यांनी आज आपली वयाची ७० वर्षे पूर्ण केली असून त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने बांदेकर यांनी त्यांच्या दहाव्या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यांच्या जन्मदिनी पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पुस्तक लिहीण्यास ते गेल्या १० वर्षापासून प्रयत्नरत होते. ‘’संजयदृष्टी’’ या पुस्तकात गोव्यातील सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवर आधारित लेखांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांनी बांदेकर यांचे त्यांच्या वाढदिनी अभिनंदन केले आणि समाजातील दलितांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

याशिवाय संजय भाऊ चौधरी यांनी लिहीलेल्या गोवा संस्कृती आणि गोव्याच्या भूमीत या पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. पुणेतील संज्योती प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. समाज सेवक विराज बांदेकर यावेळी उपस्थित होते.